आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/लखनऊ - अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी सकाळी १०.३० वाजता निकाल सुनावेल. शनिवारी न्यायालय बंद असते, परंतु निकाल देण्यासाठी घटनापीठ उपस्थित असेल. २०६ वर्षांपूर्वीच्या या वादावर सलग ४० दिवस सुनावणी करून सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना बोलावून घेत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. निकालाची वेळ निश्चित होताच देशभर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यूपी, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत शनिवारी शाळा बंद राहतील. यूपीत अनेक जिल्ह्यांत पोलिसांनी पथसंचलन केले. सोशल मीडियावर भडकावू पोस्ट करू नका, असा इशारा सरकारने दिला आहे.
अफवा पसरू देऊ नका, सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकू नका, असे संदेश फॉरवर्डही करू नका. प्रक्षोभक मजकुराविषयी पोलिसांना तत्काळ माहिती द्या. निकालानंतर आनंदोत्सव किंवा विरोधी निदर्शनात सहभागी होऊ नका.
> यूपी, मप्र, दिल्लीसह अनेक राज्यांत शाळा, कॉलेज बंद; यूपीत ३४ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
> सरन्यायाधीश रंजन गोगोईंना झेड+ सुरक्षा, निकाल देणाऱ्या सर्व न्यायमूर्तींची सुरक्षा व्यवस्था वाढवली
> पंतप्रधान म्हणाले -निकाल काहीही असो, हा कुणाचा विजय किंवा पराभव असणार नाही
देशाला या सात प्रश्नांची मिळतील उत्तरे
> अयोध्येत श्रीरामांचे खरे जन्मस्थान कोणते आहे?
> वादग्रस्त जमिनीवर नेमका मालकी हक्क कुणाचा?
> सध्या जमीन कुणाच्या ताब्यात, पुढे कोण मालक?
> ते मंदिर होते तर तेथे मशीद कशी उभी राहिली?
> अयोध्येवर एएसआयचा अहवाल कितपत खरा?
> रामलल्ला विराजमान न्यायिक व्यक्ती आहे का?
> या प्रकरणात मशिदीची ओळख नेमकी कोणती?
अलाहाबाद हायकोर्टाने ३ भागांत वाटली होती वादग्रस्त जमीन
अयोध्येत २.७७ एकर जमिनीचा वाद आहे. अलाहाबाद हायकोर्टाने ३० सप्टेंबर २०१० रोजी रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्डात ही जमीन वाटून दिली होती. याविरुद्ध सुप्रीम कोर्टात १४ याचिका दाखल झाल्या. मध्यस्थीचे प्रयत्न फोल ठरल्यावर सुप्रीम कोर्टाने ४० दिवस सलग सुनावणी करून निकाल राखून ठेवला होता.
अयोध्या लाइव्ह : रात्री 12.00 वाजता
वादग्रस्त जमिनीकडे जाणारे सर्व रस्ते सील
शुक्रवारी रात्री सर्व मार्गांवर बॅरिकेड्स आणि सुरक्षा जवान दिसत होते. वादग्रस्त स्थळाकडे जाणारे सर्व मार्ग सील करण्यात आले होते. स्थानिक लोकांना ओळखपत्र पाहूनच अयोध्येत प्रवेश दिला जात होता. बाहेरच्या माणसांना प्रवेश नाकारण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.