Home | Business | Industries | retail companies also demand for fdi

किरकोळ व्यापारात एफडीआयला परवानगी द्या- आता व्यापार कंपन्याचेही साकडे

agency | Update - May 30, 2011, 10:36 AM IST

जीवनाश्यक वस्तू व किरकोळ व्यापार विभागातही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन देशातील किरकोळ व्यापार कंपन्यांनी केंद्र सरकराला केले आहे.

  • retail companies also demand for fdi

    नवी दिल्ली- जीवनाश्यक वस्तू व किरकोळ व्यापार विभागातही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन देशातील किरकोळ व्यापार कंपन्यांनी केंद्र सरकराला केले आहे.

    ' फ्युचर ग्रुप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी यांनी 'प्रेस ट्रस्ट'ला सांगितले की, मल्टि ब्रँड व्यापारात 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट'ला ('एफडीआय') व्यवसायाची परवानगी दिल्यास अशा व्यापाराची मजबूत यंत्रणा उभी राहील आणि महागाईलाही आळा बसेल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांच्या मार्गदशनाखाली आंतर मंत्रालय गटाने 'मल्टि ब्रँड रिटेल'मध्ये 'एफडीआय'ला परवानगी देण्याची आणि शेतीमालासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषि उत्पादन कायद्यात बदल करण्याची शिफारस दोन दिवसापूर्वीच केली होती. त्याविषयी भाष्य करताना बियाणी यांनी या शिफारशीचे स्वागत करुन सरकारला निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

Trending