आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - एसबीआयने आर्थिक सुस्तीचे चिंताजनक चित्र दाखवले आहे. बँकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार डाॅ. साैम्याकांती घाेष यांच्या अहवालानुसार २०१९-२० मध्ये सुमारे १६ लाख नव्या नोकऱ्या घटणार आहेत. २०१८-१९ मध्ये एकूण ८९.७ लाख नव्या नोकऱ्या मिळाल्या होत्या. एप्रिल-ऑक्टोबर २०१९ पर्यंत ४३.१ लाख नव्या नोकऱ्यांचे सृजन झाले. वर्षभरासाठी त्याची सरासरी ७३.९ लाख आहे. तसेच यंदा सरकारी नोकऱ्याही ३९ हजारांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.
> चाकरमान्यांचे खिसे रिते
परराज्यात नोकरी करणारे चाकरमानी आपल्या घरी कमी पैसे पाठवत आहेत. दिवाळखोरी प्रक्रियेच्या निकालांत विलंबाने कंपन्या कामगारांच्या संख्येत मोठी कपात करत आहेत.
> पगारवाढीवरही संक्रांत
५ वर्षांत उत्पादकता वृद्धी दर ९.४% ते ९.९% दरम्यान राहिला. यामुळे यंदा कमी पगारवाढीची शंका आहे. यामुळे काॅर्पाेरेशन्स व इतर ग्राहक गरज नसतानाही कर्जे उचलू शकतात.
अहवाल यासाठी महत्त्वाचा...
ब्लूमबर्गनुसार बेराेजगारी दर ४५ वर्षांच्या उच्चांकावर आहे. घटत्या रोजगारांमुळे सरकारवर दबाव वाढेल. २०१८ मध्ये १२ हजारांवर बेराेजगारांनी आत्महत्या केली होती.
...त्यावर महागाईचा वार
नवी दिल्ली - डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५% वर पोहोचला. हा साडेपाच वर्षांचा उच्चांक आहे. यापूर्वी जुलै २०१४ मध्ये तो सर्वाधिक ७.३९% झाला होता. खाद्यपदार्थ विशेषकरून कांदा दहापट महागल्याने महागाई दर वधारला. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत डिसेंबर २०१९ मध्ये भाजीपाला ६०.५% महागला. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर १४.१२% होता. तो डिसेंबर २०१८ मध्ये -२.६५% होता.
मागणीत घट होऊनही वाढत्या महागाईचे दोन धोके
> तज्ज्ञांनुसार, सुधारणेचे उपाय झाले नाही तर देश स्टॅगफ्लेशनमध्ये जाऊ शकतो. बेरोजगारीसह उच्च महागाई दर व मागणीत घट होण्याच्या स्थितीस स्टॅगफ्लेशन म्हटले जाते.
> आरबीआयने डिसेंबर व्याजदर स्थिर होते. आता आढावा येत्या ६ फेब्रुवारीला आहे. कोअर इन्फिलेशन घटत आहे. म्हणजेच मागणीत घट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
> खाद्यपदार्थांचा महागाई दर डिसेंबर २०१९ मध्ये वाढून १४.१२% वर गेला. हा दर गतवर्षी मार्चपासून सातत्याने वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.