आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरकोळ महागाई दर 19 महिन्यांच्या नीचांकावर; जानेवारीत 2.05% तर जून 2017 मध्ये होता 1.46% 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाज्या, अंडी यांसह खाद्यपदार्थांच्या दरात तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्याने किरकोळ महागाई दर २.०५ टक्क्यांची नोंद झाली आहे. मागील १९ महिन्यांतील ही महागाईची नीचांकी पातळी आहे. याआधी जून २०१७ मध्ये महागाई दर १.४६ टक्के हाेता. तर एका वर्षापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये हा ५.०७ टक्क्यांवर होता. डिसेंबर २०१८ च्या किरकोळ महागाई दरात दुरुस्ती करण्यात आली असून हा २.१९ टक्क्यांवरून २.११ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (सीएसओ) च्या वतीने मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंधन आणि वीज श्रेणीमध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली असून हा २.२ टक्के नोंदवण्यात आला आहे. हा डिसेंबर २०१८ मध्ये ४.५४ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या महागाई दरातही घसरण दिसून आली आहे. हा (-) २.१७% नोंदवण्यात आला आहे.

 

हा डिसेंबर २०१८ मध्ये (-) २.५१% नोंदवण्यात आला होता. किरकोळ महागाई दरात घट झाल्यामुळेच मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यश बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ शुभदा राव यांनी सांगितले की, हिवाळ्याचा हंगाम जास्त दिवस कायम राहिल्याने खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे दर कमी झाले आहेत. इंधनाच्या किमतीमध्ये घट झाल्याने ही महागाई दर कमी राहण्यास मदत मिळाली आहे. आयसीआयसीआय बँकेचे जागतिक बाजार प्रमुख बी. प्रसन्ना यांनी सांगितले की, किरकोळ महागाई दर व औद्योगिक उत्पादनाचा आकडा अपेक्षेनुसार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...