आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Retail Inflation Fell To A One and a half year Low And Stood At 2.19 Per Cent Due To Cheaper Fuel

किरकोळ महागाई दर दीड वर्षाच्या नीचांकावर,इंधन स्वस्त झाल्याने २.१९ टक्क्यांवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फळे, भाज्या आणि इंधन यांच्या किमती कमी झाल्याने सोमवारी मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर २.१९ टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या १८ महिन्यांतील सर्वात नीचांकावर आहे. एक महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर २०१८ मध्ये हा २.३३ टक्के, तर डिसेंबर २०१७ मध्ये ५.२१ टक्क्यांवर होता. दुसरीकडे घाऊक महागाई दरही  ३.८० टक्क्यांसह आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.  


याआधी नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूपीआयवर आधारित हा महागाई दर ४.६४ टक्क्यांवर आला होता आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा ३.५८ टक्क्यांवर होता. याआधी एप्रिलमध्ये ३.६२ टक्के घाऊक महागाई दर नोंदवण्यात आला होता. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांतील महागाई दर ०.०७ टक्के राहिला. हा नोव्हेंबरमध्ये ३.३१ टक्के होता. डिसेंबरमध्ये भाज्यांतील महागाई दर १७.५५ टक्के राहिला, जो याआधीच्या महिन्यात २६.९८ टक्के होता.  

 

पेट्रोल-डिझेलमध्ये दिलासा  
डिसेंबर २०१८ मध्ये इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई दर कमी होऊन ८.३८ टक्क्यांवर आला आहे, जो नोव्हेंबरच्या १६.२८ टक्क्यांच्या तुलनेमध्ये अर्धा आहे. डिसेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दरात ही घट नोंदवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...