आकडेवारी / किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये 5.54% पर्यंत पोहोचला, मागील तीन वर्षांतील सर्वाधिक; खाद्यपदार्थ महागल्याचा परिणाम

जुलै 2016 मध्ये किरकोळ महागाई दर 6.07% पेक्षा जास्त होता

वृत्तसंस्था

Dec 12,2019 07:05:00 PM IST

नवी दिल्ली - किरकोळ (रिटेल) महागाई दर नोव्हेंबरमध्ये 5.54% पोहोचला आहे. गेल्या 3 वर्षांतील सर्वाधिक महागाई दर आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर 4.62% होता. किरकोळ महागाई दराने सलग दुसर्‍या महिन्यात आरबीआयच्या मध्यम मुदतीचे लक्ष्य (4%) ओलांडले. आरबीआय पतधोरण आढावा घेताना व्याज दर ठरविताना किरकोळ महागाई दराचा विचारात घेते. या महागाई दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे.

सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी ही आकडेवारी जारी केली. खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दरावर परिणाम झाला. अन्नधान्य चलनवाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 10.01% होता. ऑक्टोबरमध्ये 7.89% आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये (-) 2.61% होता.

महिना किरकोळ महागाई दर
जून 3.18%
जुलै 3.15%
ऑगस्ट 3.28%
सप्टेंबर 3.99%
ऑक्टोबर 4.62%
नोव्हेंबर 5.54%


ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादनांत 3.8% घट


सांख्यिकी विभागाने औद्योगिक उत्पादनांची आकडेवारी देखील जारी केली. यामध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घट दिसून आली. इंडस्ट्रियल ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन (आयआयपी)मध्ये सप्टेंबर महिन्यात 4.3% आणि ऑगस्टमध्ये 1.1% घट झाली होती. ऊर्जा, खाण आणि उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे या निर्देशांकात अधिक परिणाम झाला. आयआयपीचे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्व असते. आयआयपी औद्योगिक विकासाची गती दर्शवते.

X
COMMENT