Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Retired deputy superintendent has transformed village

निवृत्त उपअधीक्षक असलेल्या सरपंचाने केला गावाचा कायापालट

अनिल गर्जे | Update - Aug 27, 2018, 11:30 AM IST

गावच्या विकासाच्या स्वप्नाने त्यांना झपाटले. गावाशी नाळ जोडत व ती मजबूत करण्यात यश येताच ते समाजाचे सेवेकरी

 • Retired deputy superintendent has transformed village

  नेवासेफाटा- गावच्या विकासाच्या स्वप्नाने त्यांना झपाटले. गावाशी नाळ जोडत व ती मजबूत करण्यात यश येताच ते समाजाचे सेवेकरी बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने वर्षभरातच मोठी मजल मारली.


  सरपंच नाथा घुले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासाची गंगा आणली. नियोजनबद्ध पद्धतीने या गावचा होत असलेला विकास व बदललेलं रूप कौतुकास्पद आहे. नाथा घुले यांचा पोलिस उपअधीक्षक ते सरपंच असा पोलिस वर्तुळातून राजकीय, सामाजिक वर्तुळातला प्रवास.


  नोकरीनिमित्त बाहेर असतानाही गावाची नाळ घुले यांनी तुटू दिली नाही. सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली उडी यशाचा राजमार्ग दाखवणारी ठरली. सरपंच घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरातच गावात विकासगंगा अवतरू लागली. गावातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले. उर्वरित रस्त्यांचे काम सुरू आहेत. बंदिस्त गटार योजना पूर्णत्वास गेली. नळजोडणीला मीटर बसवण्यात आल्याने गावात मोजूनमापून पाणी पुरवठा होऊ लागला. पाण्याची उधळपट्टी व अपव्यय थांबला. गावासह वस्त्यांकडे असलेल्या मार्गांवर १०० एलईडी पथदिवे बसवण्यात आले. ६० लाख खर्चाची काँक्रिटीकरणाची कामे गावात झाली आहेत. अपंगांसाठी असणारा २५ हजार रूपयांचा निधीही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. गावात तीन लाख रूपये खर्चाचे शुद्ध पाण्याचे सेन्सर सिस्टिमचे यंत्र बसवल्याने अवघ्या पाच रूपयांत २० लिटर शुदध पाणी उपलब्ध झाले आहे. साडेपाच लाख खर्चातून पथदिवे बसवण्यात आल्याने प्रकाशवाट उजळली आहे. महादेवाचे मंदिर सरपंच घुले यांनी स्वखर्चाने बांधले. मंकावती देवी मंदिराचे लोकवर्गणीतून सुरू असलेले जीर्णोद्धाराचे कामही प्रगतिपथावर आहे. प्राथमिक शाळेला खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.


  करवसुलीसाठी कठोर भूमिका
  करवसुलीसाठी कठोर भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे. नियमांवर बोट ठेवणारा पोलिसी खाक्याचा अनुभव कारभार करताना अवलंबवला जात आहे. पट्टी भरलेली असेल, तरच ग्रामपंचायतीचा दाखला मिळेल, अशी अट असल्याने वसुलीतही शिस्त लागली आहे. पंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यात आला आहे. गाव पाणीदार बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जलसंधारणाचे पाऊल टाकले जाणार आहे. गावाच्या शिवरात साखळी बंधारे निर्माण करण्याचे ठरवले आहे. बांधबंदिस्ती, गॅबियन स्ट्रक्चर, नवीन माती बांध,ओढेनाले खोलीकरण-रूंदीकरण हाती घेतले जाणार आहेत.

Trending