Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Retired General Manager of District Bank J. Bhosale passes away

जिल्हा बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक ए. जे. भोसले यांचे निधन

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 11:14 AM IST

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक ए. जे. भोसले (वय ७५) यांचे अल्प आजाराने सोमवारी सायंकाळी ७ वाजता

  • Retired General Manager of District Bank J. Bhosale passes away

    सोलापूर- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक ए. जे. भोसले (वय ७५) यांचे अल्प आजाराने सोमवारी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. गेल्या महिनाभरापासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांच्या मूळ गावी खवणी (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी विजया भोसले, धनंजय व अभय असे दोन मुले, मुलगी जयश्री काटुळे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


    ए. जे. (अज्ञानराव जालिंदर) भोसले यांनी ३४ वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवा बजावली असून त्यातील १५ वर्षे ३ महिने त्यांनी सरव्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा बँकेला नावारूपास आणून आर्थिकदृष्ट्या बँक सक्षम करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. त्यांची प्रगतशील बागायतदार म्हणून ख्याती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी व सिंचन क्षेत्राचा त्यांना दांडगा अभ्यास होता.


    योगायोग म्हणजे ३ सप्टेंबर रोजी (कै.) ब्रह्मदेवदादा माने यांचा स्मृती दिन होता. त्याच दिवशी ए. जे. भोसले यांची प्राणज्योत मावळली. सहकार तपस्वी (कै.) ब्रह्मदेवदादा माने यांचे जावई, माजी आमदार दिलीप माने यांचे मेव्हुणे, बाजार समितीचे संचालक विजया भोसले यांचे पती व कंचेश्वर शुगरचे चेअरमन धनंजय भोसले यांचे ते वडील होत.

Trending