आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त जवानाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हिंगोली रेल्वेस्थानक परिसर दुमदुमला

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे गवळी यांच्यासह प्रवाशीही भारवून गेले

मंगेश शेवाळकर

हिंगोली- सैन्यदलामधे 17 वर्षे खडतर सेवा करुन सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे आज(मंगळवार, 3 मार्च) सकाळी साडे आकरा वाजता रेल्वेस्थानकावर वाहतुक शाखेच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात स्वागत केलेे. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आले.  भारत माता की जयच्या घोषणांनी रेल्वेस्थानक परिसर दुमदुमला होता. त्यांना रेल्वेस्थानकामधून खांद्यावर उचलून वाहनामधे बसविले. पोलिसांकडून झालेल्या या आगळ्या वेगळ्या स्वागताने जवाना सह प्रवाशीही भारावून गेले होते.


सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण येथील विनोद संभाजी गवळी हे जवान मागील 17 वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते. अतिशय खडतर परिस्थितीत देशसेवा करून गवळी हे गुजरात येथून सेवानिवृत्त झाले. आज सकाळी ते रेल्वेने हिंगोली येथे येणार असल्याची माहिती वाहतुक शाखेला मिळाली होती. त्यावरून वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, शेषराव राठोड, वसंत चव्हाण, जयप्रकाश झाडे, रवी गंगावणे, रावसाहेब घुमनर, गजानन सांगळे, सागर जैस्वाल, विकास गवळी यांची उपस्थिती होती. सकाळी साडे आकरा वाजता जवान गवळी रेल्वेेतून उतरताच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले.


त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक चिंचोलकर व कर्मचाऱ्यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी रेल्वेस्थानक परिसर दुमदुमला होता. त्यानंतर रेल्वेस्थानकातून खांद्यावर उचलून त्यांना रेल्वेस्थानका बाहेर वाहनामधे बसविण्यात आले. यावेळी पेढे वाटपही करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे जवान गवळी यांच्यासह प्रवाशीही भारवून गेले होते.