आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Retired Major General Kills 2 People Including Lawyer In Court Room, Killed By Security Guards On Time In Thailand Court

निवृत्त मेजर जनरलने कोर्ट रूममध्ये वकीलासहित 2 जणांची केली हत्या, सुरक्षा गार्ड्सनी वेळीच केले ठार  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस विभागातील माजी मेजर जनरल 10 वर्ष जुन्या जमीन प्रकणासाठी न्यायालयात आला होता
  • कोर्ट रूममध्ये थायलंडमधील प्रसिद्ध वकील आणि त्यांच्या सहय्यकासोबत मेजरची बाचाबाची झाली
  • या घटनेत वकीलाची पत्नी आणि दुसरा एक वकीलदेखील गंभीर जखमी

बँकॉक- थायलंडच्या न्यायालयात मंगळवारी पोलिस विभागातील एका निवृत्त मेजर जनरलने वकीलासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर अनेक गोळ्या झाडल्या. मेजर 10 वर्षे जुन्या एका जमिनीच्या प्रकरणासाठी कोर्टात आला होता. या घटनेत देशातील एका प्रसिद्ध वकीलाचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेदरम्यान कोर्टातील सुरक्षा रक्षकांनी मेजरला ठार केले.

मेजरचा 1500 एकर जमिनीचा वाद सुरू होता
 
थायलंडच्या स्थानिक वृत्तपत्रानुसार, न्यायाधिशांच्या येण्यापूर्वी सकाळी 9 वाजता मेजर जनरल थानिन चंत्रातिप(67 साल) आणि त्यांच्या विरोधी पक्षातील लोक आले होते. दोन्ही पक्षातील लोक 1500 एकर जमिनीच्या प्रकरणाच्या निकालाची वाट पाहत होते. यावेळी जनरल चंत्रातिप आणि विरोधी पक्षातील वकील प्लेनटिफमध्ये बाचाबाची झाली. यात वकीलाची पत्नी आणि इतर दोघेजणही सामील झाले. त्यानंतर जनरलने बंदुक काढली आणि वकीलावर अनेक गोळ्या झाडल्या. यात प्लेनटिफ आणि त्यांच्या सहाय्यकाचा जागीच मृत्यू झाला.