International Special / माजी सैनिकाने युद्धात गमावला पाय, सिगारेट कंपनीने कँसर पीडित म्हणून वापरला फोटो


यूरोपिअन कमीशनने फोटोच्या वापराला निव्व्ळ योगायोग असल्याचे सांगितले

दिव्य मराठी वेब

Jul 21,2019 12:53:00 PM IST

पॅरिस- फ्रान्सचे रहिवासी असलेल्या 60 वर्षीय माजी सैनिकाने सिगारेट कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप लावले की, कंपनीने त्यांना न विचारता त्यांचे फोटो सिगारेटच्या पॅकेटवर वापरले. तर त्या सैनिकाचे म्हणने आहे की, त्यांनी आपला पाय अल्बानियामध्ये गोळीबारा दरम्यान गमावला होता.


यूरोपिअन कमीशनने फोटोच्या वापराला निव्व्ळ योगायोग असल्याचे सांगितले
सिगारेटच्या पॅकेटवर त्यांच्या पायाच्या फोटोसोबत एक चेतावनी लिहीली, "धूम्रपानामुळे फुफ्फुस घराब होतात." या फोटोंना परवानगी देणाऱ्या यूरोपिअन कमीशनने हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले आहे. 2014 च्या नियमांनुसार, यूरोप सिगारेट आणि तंबाखु कंपन्यांच्या पॅकेटवर इशारा देणे बंधनकारक आहे.


रिपोर्ट्सनुसार, सैनिकच्या मुलाने मागील वर्षी हा फोटो पाहिला होता. त्याने फोटोत वडिलांच्या अंगावरील जखमांवरुन त्यांची ओळख पटवली. त्याने ते पॅकेट घरी आणले आणि आपल्या वडिलांना दाखवून खात्री करुन घेतली. त्यानंतर त्यांनी कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली.


सैनिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 1997 मध्ये अल्बेनियामध्ये शुटिंगदरम्यान त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला होता. मागील 20 वर्षांपासून ते कुबड्यांच्या साहाय्याने चालतात. ते म्हणाले की, मी कधीच फोटो वापरण्याची परवानगी दिली नाही. हा फोटो 2018 मध्ये एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी गेलो असता काढला आहे.

X
COMMENT