आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूतून शिक्षण घेऊन गावी परतले, मत्स्यपालनाला केली सुरुवात, शेतकऱ्यांसाठी ठरताहेत प्रेरणादायी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधेपुरातील ज्योती मंडल शेतकऱ्यांना देताहेत आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याचे धडे, या क्षेत्रात मिळवले प्रावीण्य
  • धान्य-गव्हाऐवजी मत्स्यपालन केल्याने शेतकऱ्यांचे आयुष्य बदलेल

मधेपुरा - सदर प्रदेशातील बखरी गावातील रहिवासी आणि जेएनयूचे माजी विद्यार्थी ज्योती मंडल यांचा मत्स्यपालन व्यवसाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मोठ्या कार्यक्रमात केवळ मधेपुरातीलच नव्हे, तर सहरसा आणि सुपौल भागातील नागरिकही ज्योतींकडून मासे मागवतात. ज्योती मत्स्यपालन व्यवसायासाठी १६ एकर जमिनीचा वापर करतात. दुसऱ्या राज्यातून महाग दरात माशांचे खाद्य मागवण्याऐवजी ज्योती स्वतःच माशांचे खाद्य बनवण्याच्या दिशेने कार्यरत आहेत. याच महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय महाविद्यालयात ओपीडीचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. या वेळी ते ज्योती यांच्या शेततळे आणि मत्स्य उत्पादन प्रकल्पास भेट देऊ शकतात. प्रदीर्घ अनुभव आणि संशोधनानंतर त्यांनी मत्स्य उत्पादन क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे. हसतमुख, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ज्योतींचे शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले. गावी परतल्यानंतर त्यांनी पारंपरिक शेतीकडे लक्ष केंद्रित केले. मात्र पुरेसा नफा न मिळाल्याने ते वैज्ञानिक शेतीकडे वळले. शेतीतून अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळाल्याने त्यांनी मत्स्यपालन व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक राज्यांमध्ये मत्स्यपालनाविषयीची तंत्र जाणून घेऊन याबाबत ज्ञान प्राप्त केले. नंतर तळ्याचे खोदकाम सुरू केले.
 

धान्य-गव्हाऐवजी मत्स्यपालन केल्याने शेतकऱ्यांचे आयुष्य बदलेल
 
ज्योती सांगतात की, कोसी परिसरातील शेतकरी धान्य-गव्हाची शेती करून कुटुंब पोसतात. दोन एकर जमिनीवरही ते तळे खोदून मत्स्यपालन करू शकतात. ते यातून दरवर्षाला पाच लाख रुपये कमावू शकतात. शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल नाही. मात्र आता सरकारकडूनही आता शेततळे आणि मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी एक खिडकी योजना राबवण्याची गरज आहे. सरकारनेही पुरेसे प्रयत्न करायला हवे. तसेच बँकांनीदेखील सहकार्य करायला हवे. 
 बातम्या आणखी आहेत...