आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाहेरच्या जगात राहणे अशक्य वाटल्याने पुन्हा तुरुंगात परतला; 20 वर्षांची शिक्षा भोगून सुटला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 न्यूयॉर्क- अमेरिकेत राहणारा विल्यम गेलेघर काही दिवसापूर्वीच हत्येच्या गुन्ह्यात २० वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटला होता. इतर कैद्याप्रमाणे त्यालाही नव्याने आयुष्य सुरू करण्याची इच्छा होती.  परंतु बाहेरच्या जगाशी जुळवून घेणे त्याला इतके अवघड झाले की, पुन्हा चोरी करून तुरुंगात परतणेच त्याला योग्य वाटले. न्यू जर्सीच्या तुरुंगातून सुटलेला विल्यम पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने  यावेळी चोरी करण्यासाठी विस्कोंसिनला गेला.

 

कारण त्याला कोणीतरी सांगितले होते की, या परिसरातील तुरुंगात असलेल्या कैद्यांना चांगले जेवण मिळते. त्यामुळे त्याने बँक लुटण्याची योजना आखली. योजनेनुसार त्याला बँक लुटण्याची इच्छा नव्हती. पण त्याला कसेही करून तुरुंगात जायचे होते. म्हणून त्याने बँकेतून १०० डॉलर चोरलेे. 

 

बातम्या आणखी आहेत...