आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने लावला जन्मदात्यावर बलात्काराचा आरोप, पोलिसांना आला संशय, चौकशीत समोर आले हे सत्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड(पंजाब)- घरगुती वाद आणि संपत्तीच्या वादामुळे लोक कोणत्या स्तराला जाउ शकतील याचा अंदज घेणे अवघड आहे. पंजाबच्या चंदिगडमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका मुलीने आपल्या जन्मदात्या पित्यावरच बलात्काराचा आरोप लावला आहे. या आरोपानंतर वडिलांना इतका मानसिक आघात बसला की, ते घर सोडून निघून गेले. जाण्यापूर्वी व्यक्ती म्हणाला- माझ्या अजून मुली आहेत, या आरोपासोबत मी त्यांना कसे तोंड देऊ? पोलिसांना व्यक्तीच्या खऱ्यावर विश्वास आला आणि त्यांनी मुलीची कसून चौकशी केल्यावर सत्य समोर आले.


कलम-164 अंतर्गत साक्षीची नोंद
मुलीने पोलिसांना दिलेल्या साक्षीत सांगितले-''मला माझ्या आत्याजवळ राहायचे होते, पण वडील मला राहू देत नव्हते. त्यामुळे आत्याच्या सांगण्यावरू वडिलांवर बलात्काराचा आरोप करून तक्रार दाखल केली.'' यानंतर पोलिसांनी मुलीला न्यायाधिशासमोर साक्ष नोंदवली. तिथे तिने आत्याचे नाव घेतले नाही, पण वडिलांवर खोटा आरोप केल्याचे कबुल केले. या साक्षीनंतर पोलिसांनी वडिलांविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेतला.