आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांच्या अट्टल गुन्हेगारासोबत दोन हात करणार राणी मुखर्जी; खलनायक कोण हे अद्याप स्पष्ट नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - राणी मुखर्जीने नवरात्रोत्सवाच्या मुहुर्तावर आपला आगामी चित्रपट ‘मर्दानी २’च्या प्लॉटचा खुलासा केला आहे. गेल्या वेळी याच चित्रपटात तिने शिवानी रॉयचे पात्र साकारताना लहान मुलांचे शोषण करणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासोबत दोन हात केले होते. तथापि, या वेळी शिवानी २१ वर्षाच्या अट्टल गुन्हेगारासोबत फायटिंग करताना दिसेल. यात किशोरवयातून प्रौढावस्थेत पाऊल टाकणाऱ्या युवकांची हिंसक वृत्ती दाखवणे हा निर्मात्यांचा उद्देश आहे. साधारणत: अनेक प्रकरणांमध्ये किशोरवयीन गुन्हेगारांचा त्यांच्या वयामुळेच बचाव होत असल्याचे बघायला मिळते. निर्मात्यांना वाटते की, ‘मर्दानी’ हा एका पोलिस अधिकाऱ्यावर आधारित थ्रिलरपट आहे, त्यामुळेच चित्रपटात वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारीचे विविध पैलु समोर आणले पाहिजेत. दुसऱ्या भागात चित्रपटात कमी वयातील मुलांची गुन्हेगारी प्रकरणे दाखवले जातील. चित्रपट याच वर्षी १३ डिसेंबर रोजी रिलीज होईल.

खलनायक कोण साकारणार, हे अद्याप स्पष्ट नाही
चित्रपटामध्ये राणीच्या विरुद्ध खलनायक कोण असेल, हे अद्यापपर्यंत निर्मात्यांनी स्पष्ट केलेले नाही. गेल्या वेळी ताहिर भसीनने नकारात्मक भूमिका साकारली होती. निर्माते या वेळीही दमदार पात्राला संधी देतील. 


चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. त्या वेळी गोपी पुथरन चित्रपटाचे लेखक होते. प्रदीप सरकार यांनी या भागाचे दिग्दर्शन न करण्यामागचे स्पष्ट कारण सांगितलेले नाही. प्रदीप म्हणाले, ‘एक तर माझा यशराजसोबत तीन चित्रपटांचा करार पूर्ण झालेला होता. दुसरे म्हणजे मला स्वतंत्र निर्माता म्हणून काम करायचे आहे. सोबतच सध्या इंडिया फिल्म प्रोजेक्टच्या नवव्या सीझनचा परीक्षक म्हणूनही मी काम पाहत आहे. त्यासाठी ५० तासांमध्ये चित्रपटाची शूटिंग, एडिटिंग आणि पोस्‍ट प्रोडक्‍शन करणाऱ्या कुशल व्यक्तीच्या शोधात आहे.

‘जसे नवरात्र म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, तर दुर्गा वाइट लोकांच्या विरुद्ध उभी राहून त्यांचा नायनाट करते. असाच आमच्या चित्रपटाचाही सार आहे. माझे पात्र शिवानी या भागामध्येही महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविरोधात सक्षमपणे उभी राहते. ‘वॉर’देखील रिलीज होत असल्याने मी खूश आहे.’ - राणी मुखर्जी 


‘चित्रपटामध्ये राणी मुखर्जीचे पात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा सक्षमपणे समाचार घेताना दिसते. त्यामुळे दुसऱ्या भागाशी संबंधित माहितीचा खुलासा करण्यासाठी नवरात्रोत्सवाची वेळ निवडण्यात आली आहे.’ -दिग्दर्शक, गोपी पुथरन