आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्याची आग : खुलेआम घेतला वडिलांच्या खुनाचा बदला, व्हिडिओही बनवून केला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरेंद्रनगर, गुजरात - 13 वर्षांपूर्वी झालेल्या एका लव्ह मॅरेजमुळे दोन कुटुंबांमध्ये जीवघेणा वाद सुरु झाला. तीन महिन्यांमध्ये दोन्ही कुटुंबातील एक-एक सदस्याला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी जावयाने इतर 6 लोकांसोबत मिळून आपल्या सासऱ्यांचा सर्वांसमोर मारून-मारून जीव घेतला. त्यानंतर आरोपीच्या वडिलांचा त्याच्या मेव्हण्याने आणि इतर सदस्यांनी मिळून खून केला.


- बजाणा गावातील इकबाल खानने 13 वर्षांपूर्वी हबीबची बहीण जाहिदासोबत लव्ह मॅरेज केले होते. हबीब आणि त्याच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. तीन महिन्यापूर्वी हबीबसहित इतर चार लोकांनी इकबालचे वडील रहमत यांचा खुलेआम खून केला होता.


- आत दोन दिवसांपूर्वी इकबालने त्याच पद्धतीने सासरा हनीफचा खून केला. या हल्ल्यात हनीफची पत्नीही जखमी झाली. हनीफ पत्नीसोबत बाईकवरून जात असताना बजाणा रेल्वे फाटकजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. या दरम्यान दरम्यान एका आरोपीने हल्ल्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

बातम्या आणखी आहेत...