आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, पाडळसरे धरण झाले असते तर ही वेळ आली नसती; शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी महसूलमंत्री पाटील हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी जिल्हा दाैऱ्यावर आलेले महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने हैराण झाले. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे फक्त २० मिनिटेच थांबले तर अनोरे या गावात भजनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी मन हलके केले. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात केवळ भाजपचे दोन-चार कार्यकर्ते वगळले तर आमदार शिरीष चौधरी व आमदार स्मिता वाघ हे दोन्ही आमदार गैरहजर होते.


दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालकमंत्री पाटील तालुक्यातील मंगरूळ गावी आले. या वेळी गाडीतून उतरताच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत गाडीजवळच पीक विमा नामंजूर झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तालुका गंभीर दुष्काळी छायेत असल्याने तालुक्यात गुरांच्या चारा छावण्या लावणे व पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पाचे काम जोमाने सुरू होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
 

बातम्या आणखी आहेत...