आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : तिस-या व्यक्तीत्त्वाचे संवेदनशिल वास्तव मांडण्याचा उत्तम प्रयत्न - ‘एक लडकी को देखा तो एैसा लगा’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेटिंग : 3.5  स्टार 

चित्रपट एक लडकी को देखा तो एैसा लगा
दिग्दर्शक शैली चोप्रा धर
श्रेणी सामाजिकपट
कथा गझल धालीवाल
पटकथा/संवाद गझल धालीवाल आणि शैली चाेप्रा धर
संगीत  रोचक कोहली
पार्श्वसंगीत संजय वड्रेकर-अतुल रैनंगा
कलावंत  राजकुमार राव, अनिल कपूर, सोनम कपूर, जुही चावला, रेजिना कसान्ड्रा आणि अक्षय ओबेराॅय

 

बॉलिवूड डेस्क : प्रेमकहाणी, वास्तवकथा, चरित्रपट आणि मसाला मनोरंजन ही भारती

य चित्रपटाची साधारण भट्टी आहे. मात्र, आता जीवनातील अस्पर्शीत मुद्द्यांना हात घालणारे चित्रपट पडदा व्यापून टाकत आहेत. समाजातील तिसऱ्या व्यक्तित्त्वाचे भावनाविश्व सांगणारा ‘एक लडकी को देखा तो एैसा लगा’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. अतिशय नाजुक विषय ताकदीने मांडण्यात यश आले आहे. 

 

भारतीय चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात सावकारशाही, शेती, दुष्काळ, जातीव्यवस्था, आधुनिक जग अशा विविध सामाजिक विषयांना चित्रपटातून हाताळले गेले. तर

जागतिकीकरण, भारतीय राजकारण असेही विषय दिग्दर्शकांनी मांडले. प्रेमकथांना विशेष प्रेम मिळाले. त्यानंतर भारतीय चित्रपट ग्लोबल होऊन सातासमुद्रापलीकडे गेला. प्रचंड ग्लॅमर आले. मात्र, त्यामुळे आपल्या मातीशी नाळ तुटली होती. पण, आपल्या मातीतील विषय, आपल्याच लहेजात सांगितले तर ते अधिक मनाला भिडतात, याची जाणीव नव्या दिग्दर्शकांना झाल्याने चित्रपट पुन्हा सर्वसामान्यांचे भावविश्व सांगू लागला आहे. अलीकडील काळात येऊन गेलेला ‘बधाई हो’ हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. 

 

प्रेमकथांच्या पलिकडेही एक वास्तव आहे. हे वास्तव आताच्या तरुणाईला खुणावते आहे. भारतीय चित्रपटांनी लावलेली हॅपी एन्डींग, हिरो हिरोईन आणि लग्न अशा चौकटी मोडत चित्रपट पुढे चालला आहे, ही आनंदाची बाब आहे. नेमकी हीच नस या चित्रपटात पकडली आहे. समलिंगी संबंधावर आधारित ‘एक लडकी...’  संवेदनशिल चित्रपट आहे. 

 

यापुर्वी हंसल मेहता यांच्या ‘अलीगड’ मध्येही हाच समलिंगी पुरुषांच्या दृष्टीने विषय हाताळण्यात आला आहे. यात राजकुमार रावची महत्त्वाची भूमिका होती. ग्लॅमरपासून वेगळे राहून मध्यमवर्गीय समाजाच्या व्यथा किंवा त्यांचे जगणे सांगणारे चित्रपट करण्यात विशेष रस असलेल्या राजकुमारने यामध्येही उत्तम भूमिका निभावली आहे. समलिंगीसंबंधाचे वास्तव भारतीय समाजाने आजपर्यंत स्विकारले नव्हते. पण, नवी पिढी प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला महत्त्व देणारी असल्याने आजच्या काळात असे विषय चित्रपटात येणे खूप महत्त्वाचे ठरते आहे. शैली चोप्राने मुलीमुलीतील समलिंगी संबंध हा विषय चांगल्या पटकथेतून मांडला आहे. चित्रपटाचा पुर्वार्ध रटाळ आहे. पण, मध्यांतरापुर्वी ५ मिनीटे चित्रपट कलाटणी घेतो. अन प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. 

 

कोणताही चित्रपट एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. वर वर पाहता मनोरंजन आणि कहाणी असली तरीही त्यामागे दिग्दर्शकाला काहीतरी सांगायचे आहे, हे या चित्रपटात प्रकर्षाने जाणवते. सत्यकथाच प्रेक्षकांच्या मनाला भिडते, बाप कोणत्याही परिस्थितीत लेकीच्या मागे उभा राहातोच आणि जगाचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदावर लक्ष द्या, अशी तीन सूत्र यामध्ये सांगण्यात आली आहेत. 

 

कथा : (3/5) 
पंजाबच्या माेगा गावात राहणाऱ्या चौधरी कुटूंबातील स्विटीची ही कहाणी आहे. स्विटीच्या लग्नाची प्रत्येकाला उत्सुकता आहे. मात्र, स्विटीचे एका मुस्लिम मुलाशी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा कांगावा तिचा भाऊ बबलु करतो. दिल्लीतील साहिल मिर्झा या लेखकाच्या ती प्रेमात आहे, असे सर्वांनाच वाटू लागते. पण, प्रकरणाच्या खोलाशी जातो, तशी स्विटीची प्रेमकहाणी निराळेच वळण घेते. या प्रेमाचे काय होते, हेच पाहणे उत्सुकतेचे आहे. 


दिग्दर्शन : (3/5)   
संवेदनशिल विषय चांगल्या पटकथेच्या माध्यमातून मांडला आहे. मध्यंतरापुर्वी संथ असलेला चित्रपट नंतर वेगवान वळण घेतो. हा विषय असाच मांडला जाऊ शकतो, हे शेवटाकडे जाताना जाणवू लागते. कलावंतांची निवड चांगली राहीली. दिग्दर्शन, चित्रीकरणाच्या जागा मध्यमवर्गाला लक्षात घेऊन निवडल्याने चित्रपट अधिक मनाला भिडतो. 


अभिनय : (3.5/5)
राजकुमार राव, अनिल कपूर आणि सोनम कपूर या निघांनीही उत्तम अभिनयाने भूमिकांना न्याय दिला. जुही चावला मात्र निराशा करते. आपल्या काळातील ताकदीची अभिनेत्री असलेल्या चुहीने यात अभिनयात अतिशक्तो केल्याचे जाणवते. जुहीकडे एक संवेदनशिल अभिनेत्री म्हणून पाहिले जाते, तिने अशा भूमिका करणे खटकणारे आहे. 


संगीत : (2.5/5)
चित्रपटातील गाणी मनावर गारुड करणारी नाहीत. पण, लेकीची भावनिक काेंडी समजावून घेताना बापाच्या जीवाची होणारी घालमेल ‘चिठ्ठीया..’ हे गाणे मनाला भिडणारे आहे. पिळवटून टाकणाऱ्या भावना यातून उत्तमपणे मांडल्या गेल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...