ऑटो डेस्क - महिंद्रा अॅन्ड महिंद्राने नुकतेच आपले देशातील पहिले इलेक्ट्रिक ऑटो लाँच केले आहे. कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या ऑटोला ट्रियो असे नाव दिले आहे. या ऑटोची बंगळुरू येथील एक्स-शोरूम किंमत 1.36 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे, की या ऑटोला केवळ 3.50 तास फुल चार्ज केले जाऊ शकते. एकदा फुल चार्ज केल्यास 130 किलोमीटर पर्यंत धावू शकेल. तर अडीच तास चार्जिंग केल्यासही हे ऑटो 85 किमी पर्यंत अविरत चालवता येईल. एकूणच चार्जिंगसाठी वीजेचा खर्च लक्षात घेतल्यास सरासरी 50 पैसे प्रति किमी एवढाच खर्च येईल. या इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाची इतर वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी पाहा Video...