आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : उद्धव; मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'मराठा आंदोलनप्रकरणी जे अटकसत्र सुरू आहे त्यात निरपराध लाेकांची धरपकड सुरू आहे. महाराष्ट्र पेटवणारा शिवरायांचा मावळा नाही. पोलिसांकडे पुरावे असतील तर जरूर अटक करा. गुन्हे मागे घेण्याबाबत ज्या घाेषणा झाल्या त्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि ताबडतोब गुन्हे मागे घ्यावेत, सणासुदीच्या काळात त्यांच्यावर कायद्याचे खोटं विघ्न आणले आहे ते दूर करा', अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. 


मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करणारे पत्र दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा समाजासह अन्य समाजानेही न्यायाची मागणी सरकारकडे केली आहे. मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन कधी भरवणार, असा प्रश्न करत लवकरच हे अधिवेशन भरवून मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. शिवसेना मराठा समाजासोबत असून समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने राज्यात मोर्चे निघाल्याचे ते म्हणाले. 


मराठा मोर्चांमध्ये समाजकंटक घुसले आणि त्यांनीच तोडफोड केली. मात्र, गुन्हे निरपराध तरुणांवर दाखल करण्यात आले. कायद्याच्या चुकीचा वरवंटा त्यांच्या घरावर फिरतोय. वातावरण बिघडायच्या आत त्यांना न्याय द्यावा. चालढकल करून या फसवू नका, असेही ठाकरे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...