आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता जाताच भाजपत बंड, दबाव वाढवण्यासाठी पंकजा-खडसे सरसावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महत्त्वाच्या पदांसाठी पंकजा मुंडेंकडून दबावाची खेळी?
  • शिवसेनेत जाणार नाहीत; निकटवर्तीयांना विश्वास

बीड - उद्धव ठाकरेंचे गोपीनाथगडावर जाणे, मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणे आणि फेसबुक पोस्टमध्ये ‘पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे?’ हे प्रश्न पंकजा यांनी उपस्थित करणे या सर्व घडामोडींचा एकच अर्थ लावला जातो आहे की, त्या शिवसेनेत जात आहेत. मात्र, असे काहीही हाेणार नाही, असा विश्वास त्यांचे निकटवर्तीय देत आहेत. पक्षात महत्त्व वाढवण्यासाठी ही पंकजांची ‘प्रेशर टॅक्ट’ आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


परळीतून पराभूत झाल्यापासून पंकजांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी संवाद थांबवला. कोअर कमिटीच्या बैठकांना त्या हजर राहत हाेत्या, मात्र स्थानिक कोणाशीही बोलत नव्हत्या. तशातच, उद्धव यांचे गोपीनाथगडावर जाणे, पंकजांनी भेटून उद्धव यांचे अभिनंदन करणे, पंकजांच्या टि‌्वटला उद्धव यांनी उत्तर देणे या बाबी चर्चेच्या विषय बनल्या. तिथूनच पंकजा शिवसेनेत जातील, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच रविवारी पंकजांनी साेशल मीडियावर पाेस्ट टाकून ‘पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे?’ हे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना ऊत आला आहे. दबावामागे असू शकतात ही ४ कारणे

पक्षात कमी झालेले महत्त्व वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनीही भाजपत २०११ मध्ये बंड केले हाेते. आज पंकजा मुंडे त्याची पुनरावृत्ती करू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. त्याची कारणे...

1. विधान परिषदेत वर्णी लागावी म्हणून पंकजा आग्रही. पण विनोद तावडे, बावनकुळे, राम शिंदेही स्पर्धेत आहेत. या स्पर्धेत प्राधान्य मिळवणे पंकजांसाठी महत्त्वाचे.

2. विधान परिषदेत चंद्रकांत पाटील भाजपचे गटनेते होते. त्यामुळे आता फक्त आमदारकीच नव्हे, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळावे अशीही पंकजांची अपेक्षा.

3. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद मिळावे, अशीही पंकजा मुंडे यांची इच्छा असू शकते, असेही काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

4. पराभवानंतर गोपीनाथ गडावर येणाऱ्यांत घट झाल्यास वेगळा संदेश जाईल. तसे होऊ नये म्हणून चाहत्यांना येण्याचे आकर्षण वाटावे, असेही पाेस्टचे कारण असावे.यासाठी शिवसेनेत जाणार नाहीत


1. आजही भाजपलाच सर्वाधिक पसंती आहे, कारण सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकांनी त्यालाच निवडून दिले आहे.


2. शिवसेनाप्रणीत हे सरकार तिघाडीमुळे फार काळ सत्तेत राहण्याची शक्यता कमीच आहे.

3. धनंजय मुंडेंच्या पक्षाशी सेनेने जुळवून घेतले आहे. त्यामुळे ती भविष्यातील अडचण ठरू शकते.

4. ओबीसींचे बीडचे एक नेते सेनेतच गेलेत.तिथे स्पर्धा करण्यात काही साध्य होणार नाही.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनाेद तावडे म्हणतात, आमचे पंकजांशी बाेलणे झाले, त्या पक्ष साेडणार नाहीतच.
  • खा. संजय राऊत म्हणतात, पंकजाच नव्हे, अनेक नेते संपर्कात
बातम्या आणखी आहेत...