आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजरंग दलाची घोषणा- नवज्योतसिंह सिद्धू यांचे शिर कापून आणणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथग्रहण समारोहात सहभागी होण्यासोबतच पाकिस्तानी लष्कराच्या जनरलशी गळाभेट घेणारे पंजाब सरकारचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना स्वपक्षीयांकडूनच टीका सहन करावी लागत आहे. माजी क्रिकेटपटू सिद्धू यांच्याविरुद्ध जेथे बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तेथे आग्रामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाच्या एका नेत्याने देशद्रोहप्रकरणी सिद्धू यांचे शिर कापून आणणाऱ्याला 5 लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.

 

काय आहे व्हायरल व्हिडिओत...

आग्रामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संजय जाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते पंजाबच्या कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारमधील मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्या पाकिस्तानात जाऊन इम्रान खान यांच्या शपथग्रहण समारोहात जाण्याविषयी आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत. ते म्हणाले की, देशद्रोह करणाऱ्याचे शिर कापून आणणाऱ्याला ते 5 लाख रुपयांचा चेक देतील. या व्हिडिओमुळे शहरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओत सर्वात आधी संजय जाट आक्रमक पद्धतीने सिद्धूंवर टीका करताना दिसत आहेत. मग चेक दाखवत सिद्धूंचे कापलेले शिर आणणाऱ्याला 5 लाखांचे इनाम देण्याची घोषणा करताना दिसत आहेत.


नवज्योतसिंह सिद्धू नुकतेच माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदी शपथग्रहण समारोहात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. त्यांच्या अशाप्रकारे जाण्याला देशभरात विरोध करण्यात येत आहे.

 

सिद्धूंच्या पाकिस्तानात जाण्यामुळे संताप

रविवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओतही संजय जाट सिद्धू यांच्या पाकिस्तानात जाण्यावर आक्रोश करताना दिसत आहेत. व्हिडिओत ते म्हणाले की, नवज्योतसिंह सिद्धूने पाकिस्तानात जाऊन आपल्या वीर जवानांचा अपमान केला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्करी जनरलशी गळाभेट करून कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेवर आघात केला आहे. त्यांनी नवज्योतसिंह सिद्धूंना आव्हान देत म्हटले की, सिद्धू गुरूगोविंद सिंहजींचे वचन विसरले की, विशिष्ट समुदायातील लोकं कुणाचेच सख्खे होऊ शकत नाहीत. मग तुम्ही त्यांची गळाभेट कशी घेतली...
त्यांनी घोषणा केली की, जो कोणी या गद्दाराचे शिर कापून आणीन त्याला संजय जाट 5 लाख रुपयांचा चेक देईल. काही वेळा थांबून ते पुन्हा म्हणाले की, हा चेक तोपर्यंत माझ्याजवळ राहील जोपर्यंत गद्दारांचे शिर कापून येत नाही. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, नवज्योतसिंह सिद्धू यांचे सदस्यत्व रद्द केले जावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा. अन्यथा जर ते आग्रामध्ये आले तर बुटांनी झोडपून त्यांना बाहेर काढण्याचे काम बजरंग दल करेल. भाजपही सातत्याने सिद्धूंवर टीकास्र सोडत आहे. सिद्धू भाजपकडून अमृतसरचे खासदार राहिलेले आहेत. नवज्योतसिंह सिद्धू याप्रकरणी आपला बचाव करताना दिसत आहेत, परंतु वाद थांबण्याची चिन्हे नाहीत.

यामुळे नाराज हिंदू संघटनांच्या नेत्यांनी या कृत्याची निंदा केली आहे. या प्रकरणावरून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सिद्धूंचा पुतळा दहन करून विरोध दर्शवत आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...