आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भात खाल्ल्याने वाढत नाही वजन, माहिती आहे का यामागील कारण?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक भात बनवताना, फ्राय करताना जास्त तेल किंवा तुपाचा वापर करतात. यामुळे तांदळातील कॅलरीचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रियंट्स मिळावेत यासाठी तांदळाचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. आहारतज्ञ डॉ. प्रीती शुक्ला सांगत आहेत तांदूळ खाण्याच्या आरोग्यदायी पद्धती... 


एका वाटीपेक्षा जास्त भात खाऊ नका
डॉ. शैलजा त्रिवेदी सांगतात की, एका वाटीपेक्षा जास्त भात खाऊ नका. याच्या अधिक प्रमाणामुळे वजन वाढते. त्या सांगतात की, वजन कमी करायचे असेल तर भाताचे पाणी काढून ते खाणे चांगले असते. यामुळे भातामधील आवश्यक न्यूट्रियंट्स निघून जातात. याऐवजी भात तेल किंवा तूप न टाकता खा. यामुळे भातामधील कॅलरीचे प्रमाण कमी होते. पुढे जाणून घ्या भात बनवण्याच्या पौष्टिक पद्धती ज्यामुळे वजन संतुलित राहते. 


भात खाऊन कमी करा वजन 
- भात तेल किंवा तूप न टाकता बनवा. यामुळे भातामधील कॅलरीचे प्रमाण कमी होते. यामुळे वजन वाढणार नाही. 


- भात आवडत्या भाज्यांसोबत बनवा. भाज्यांमध्ये जास्त फायबर्स असतात. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. वजन सहज कमी होते. 


- पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन तांदूळ खा. यामध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त फायबर्स आणि कमी कॅलरी असतात. 


- तांदळासोबत इतर डाळी मिक्स करून खिचडी बनवा. यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. 


- तांदूळ डाळ किंवा राजमासोबत खा. या पदार्थांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी होते. 


- भात तयार करताना यामध्ये जिरे किंवा मीरपूड टाकल्याने शरीरात चरबीचे प्रमाण कमी होते. यामुळे वजन कमी होईल. 


- तांदूळ बारीक करून इडली बनवा. हे सांभारासोबत खाल्ल्याने पोट लवकर भरते. 

बातम्या आणखी आहेत...