आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला ऐश करता यावी म्हणून अब्जाधीशाने उभी केली तरुणांची फौज, तिच्यासाठी करतात ही कामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - श्रीमंत लोक आणि त्यांचे नखरे हे सगळ्यांनाच माहिती असतात. अशाच एका भारतीय अब्जाधिशाची लंडनमध्ये असलेली मुलगी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या तरुणीचा जो थाट आहे अशा अनेक तरुणी लंडनमध्ये पाहायला मिळतात. पण ही बातमी जरा वेगळी आहे. या बातमीनुसार एका अब्जाधिशाने त्याच्या मुलीला लंडनमध्ये काही त्रास व्हायला नको म्हणून 12 नोकरांची फौज उभी केली.


या अब्जाधिशाच्या किंवा त्यांच्या मुलीच्या नावाबाबत खुलासा झालेला नाही. पण ही तरुणी स्कॉटलंडच्या सेंट अँड्र्युज युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे. ज्या एजन्सीमधून तिच्यासाठी 12 नोकर नियुक्त करण्यात आले आहेत त्या एजन्सीनेही कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. एका मडियारिपोर्टनुसार तरुणीच्या सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्टाफमध्ये बटलर, शेफ, मेड, हाऊसकिपर, गार्डनर अशा सर्वांचा समावेश आहे. 4 वर्षांच्या शिक्षणासाठी गेलेल्या या अब्जाधीशाच्या मुलीबरोबर 4 वर्षे हे नोकर राहणार आहेत. या नोकरांवर जवळपास 28 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...