आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rich Peoples: India's 'super Rich' Will Grow By 73% In Four Years; Members Of The Special Club Of The Wealthy Also Increased In The Economic Recession

भारतात चार वर्षांत ‘सुपर रिच’ ७३% वाढणार; आर्थिक मंदीतही श्रीमंतांच्या विशेष क्लबचे सदस्य वाढले

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ६००० भारतीयांचा यात समावेश, किमान २१० कोटींची संपत्ती आवश्यक

लंडन- जगात आर्थिक मंदी आणि चढ- उतार असला तरी श्रीमंतांवर त्याचा विशेष परिणाम झालेला नाही. याला श्रीमंतांच्या संपत्तीचा अभ्यास करणारी इंग्लंडची संस्था नाइट फ्रँकच्या अहवालात दुजोरा मिळाला आहे. अहवालानुसार जगात सुपर रिच लोकांच्या विशेष क्लबमध्ये गेल्या वर्षी ३१ हजार म्हणजे ६% लोक आणखी वाढले. त्यामुळे गर्भश्रीमंतांची संख्या ५ लाख १३ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. समाविष्ट झालेल्या नव्या लोकांना स्टॉक मार्केट्स आणि संपत्तीच्या किमतीतील वाढीचा सर्वाधिक फायदा झाला आहे. या विशिष्ट क्लबमध्ये ज्यांच्याकडे कमीत कमी २१० कोटी रुपयांची (३ कोटी डॉलर) संपत्ती आहे तेच सहभागी होऊ शकतात.


भारताबद्दल विचार करता या क्लबमध्ये सध्या सुमारे ६ हजार भारतीय आहेत. येत्या चार वर्षांत म्हणजे २०२४ पर्यंत भारतीयांच्या संख्येत ७३% वाढीची शक्यता आहे. भारतानंतर श्रीमंतांची सर्वाधिक संख्या इजिप्तमध्ये वाढेल. तेथे सध्या ७६४ जण गर्भश्रीमंत आहेत आणि चार वर्षांत ६६% आणखी वाढतील, असे अभ्यासकांना वाटते. 

बातम्या आणखी आहेत...