Home | News | Richa Bhadra Reveal Director Asked Her To Keep Him Happy For Work

'लठ्ठपणामुळे सतत उडवली जाते खिल्ली, एका डायरेक्टरने माझ्यासमोर केली अशी डिमांड की, मी टीव्ही इंडस्ट्री सोडून पळून गेले', अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, म्हणाली - ' मी एक्पोज करणाऱ्या सीन्समध्ये कम्फर्टेबल नव्हते' 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 03:40 PM IST

एका कारणामुळे अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात ठेवले नाही परत पाऊल...  

 • Richa Bhadra Reveal Director Asked Her To Keep Him Happy For Work

  एंटरटेनमेंट डेस्क : पॉप्युलर टीव्ही शो 'खिचड़ी' मध्ये चक्कीची भूमिका करणारी अभिनेत्री ऋचा भादरा खूप काळापासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. ती टीव्ही सीरियलमध्ये आता का दिसत नाही, यासंबंधित अभिनेत्रीने अशातच दिलेल्या इंटरव्यूमध्ये खुलासा केला आहे. अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीचे डर्टी सीक्रेट्स समोर आणले. तिने जे काही सांगितले ते खूप हैरान करण्यासारखे होते. ऋचाने लग्न केले आहे आणि ती आता पतीसोबत कॉर्पोरेट जगतात काम करत आहे.

  - ऋचाने एका मीडिया हाउससोबत बोलताना सांगितले, 'मी अनेकदा कमबॅक करण्याचा विचार केला, पण बॉडी शेंमिंग आणि कास्टिंग काउचमुळे नाही करू शकले. मी 'खिचड़ी', 'बा बहू और बेबी' आणि 'मिसेस तेंडुलकर' नंतर 'गुमराह' च्या एका एपिसोडमध्ये काम केले होते. मी कधीही कास्टिंग काउच फेस केले नव्हते, पण लग्नानंतर मी जेव्हा काही ठिकाणी ऑडिशन दिल्या तेव्हा मला तडजोड करायला सांगितले गेले. जेव्हा मी एका कास्टिंग डायरेक्टरला भेटले तेव्हा तो मला म्हणाला, तू मला खुश ठेव मी तुला काम देईन. त्याला मला हॉटेलमध्ये भेटायचे होते आणि मी त्याला कॉफी शॉपला भेटायचे म्हणत होते. पण अशा सगळ्या गोष्टींनी मला आतून खूप तोडले होते. मला माझी इमेज खराब करायची नव्हती, त्यामुळे अभिनय जगतालाच मी निरोप दिला.'

  एक्सपोज करणारे सीन नाही...
  ऋचाने सांगितले, 'मी एका गुजराती फॅमिलीतील आहे पण जेव्हा गोष्ट असते रोमँटिक किंवा एक्पोज करणाऱ्या सीनची तेव्हा मी त्यामध्ये कम्पर्टेबल नव्हते. माझी फॅमिलीही यासाठी तयार नव्हती. फॅमिलीने मला सांगितले कि मी असे रोल करू नये.'

  - ऋचाने सांगितले, 'मी कधी सडपातळ अभिनेत्री नव्हते. मी नेहमी हेल्दी राहिले आहे. मी सेलिब्रिटीजला पहिले आहे जे बॉडी शेमिंगबद्दल बोलतात. अनेकदा मला स्क्रिप्टनुसार, एका लठ्ठ मुलीचे रोल ऑफर झाले. अनेकदा मला हेही सांगितले गेले की, जर अभिनय करायचा असेल; तर वजन कमी करावे लागेल. पण मला असे करायचे नव्हते. मी जशी आहे त्यात मी खूप खुश आहे.'

Trending