आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

68 व्या वर्षी बाबा होणार आहे शिल्पा शेट्टीला सर्वांसमोर Kiss करणारा अभिनेता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला 11 वर्षांपुर्वी सर्वांसमोर स्टेजवर Kiss करणारा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे बाबा होणार आहे. रिचर्ड गेरेची पत्नी अलेजेंड्रा किल्वा प्रेग्नेंट आहे. रिचर्डने एप्रिल, 2018 मध्ये सिल्वासोबत सीक्रेट मॅरेज केले होते. जवळपास 3 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सिल्वा रिचर्डची तिसरी पत्नी आहे. यापुर्वी दोन पत्नींसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. 


रिचर्डपेक्षा 33 वर्षांनी लहान आहे सिल्वा...
सिल्वा आणि रिचर्डच्या वयामध्ये जवळपास 33 वर्षांचे अंतर आहे. सिल्वा 35 वर्षांची आहे तर रिचर्ड गेरे 68 वर्षांचा झाला आहे. सिल्वा त्याची तिसरी पत्नी आहे. तर रिचर्ड हा सिल्वाचा दूसरा पती आहे. रिचर्डची पहिली पत्नी हॉलिवूडची सुपरमॉडल सिंडी क्रोफोर्ड होती. त्यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. परंतू हे लग्न फक्त 5 वर्षे टिकले. 1995 मध्ये रिचर्डने तिला घटस्फोट दिला. यानंतर रिचर्डने 2002 मध्ये कॅरी लोवेलसोबत लग्न केले. हे लग्न जवळपास 15 वर्षे चालले. परंतू 2016 मध्ये रिचर्डने कॅरीला घटस्फोट दिला. कॅरी आणि रिचर्डला 18 वर्षांचा एक मुलगा आहे. त्याचे नाव होमर आहे. 


सिल्वाचा दूसरा पती आहे रिचर्ड गेरे 
बिझनेस वुमन आणि अॅक्टिविस्ट सिल्वानेही दोन लग्न केले आहेत. रिचर्ड गेरे तिचा दूसरा पती आहे. सिल्वाचे पहिले लग्न गोविंद फ्रेडलँडसोबत झाले होते. डिसेंबर 2012 मध्ये तिने मुलगा अल्बर्टला जन्म दिला. नंतर 2016 मध्ये सिल्वाने गोविंदला घटस्फोट देऊन 2 वर्षांनंतर रिचर्डसोबत लग्न केले. 


शिल्पाला स्टेजवर सर्वांसमोर केले होते Kiss
15 एप्रिल, 2017 मध्ये रिचर्ड गेरे हा जयपुरमध्ये एड्स अवेअरनेस प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आला होता. या प्रोग्राममध्ये शिल्पाही उपस्थित होती. याच वेळी रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीला स्टेजवर मिठी मारली आणि अनेक वेळा तिला Kiss केले. या घटनेनंतर रिचर्ड गेरे आणि शिल्पा शेट्टीवर अश्लिलता पसरवणाचे आरोप लावण्यात आले होते आणि केसही दाखल झाली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...