आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Riches Of Bollywood Grew Six Months, Earning Rs 1800 Crores

सहा महिन्यात वाढली बॉलीवूडची श्रीमंती, केली १८०० कोटींची कमाई; येथे जाणून घ्या कोणत्या कलाकाराचा कोणता चित्रपट शंभर कोटीच्या घरात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या यशस्वी चित्रपटाने यावर्षी बॉलीवूडची सुरुवात झाली. वर्षभरात बॉक्स ऑफिसने दमदार कमाई केली. गेल्या वर्षात आलेल्या सर्वच चित्रपटांची कमाई अफलातून होती. उरी चित्रपटाने जागतिक पातळीवर ३४२ काेटी रुपयांची कमाई केली, तर कबीर सिंह चित्रपटाने फक्त पाच दिवसांत १०० कोटींची कमाई केली. या वर्षाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक रिपोर्ट---
 

छोटे चित्रपट बनले सुपरहिट
छोटे चित्रपटही यावर्षी सुपरहिट ठरले. तज्ज्ञांच्या मते, उरीच्या रिलीजआधी हा चित्रपट इतका हिट होईल याचा कोणीच विचार केला नव्हता. मात्र, हा चित्रपट शंभर दिवस चित्रपटगृहांत राहिला. विवेक अग्निहोत्रीचा ‘द ताश्कंद फाइल्स’ गेल्या ७५ िदवसांपासून चित्रपटगृहांत सुरू आहे. 


> ‘टोटल धमाल’ विनोदी चित्रपट होता तरीदेखील शंभर कोटींच्या घरात गेला.
> सलमानच्या  ‘भारत’ने तर चार दिवसांत १०० कोटींची कमाई करून सर्व विक्रम मोडले.
> क्रिकेट वर्ल्डकप सुरू असूनही ‘कबीर सिंह’ सोलो अॅक्टर शाहिद कपूरसाठी सरप्राइज ठरले. आता ३०० कोटींची कमाई पार करते की नाही ते पाहू. कबीर सिंह तर अजूनही चित्रपटगृहांत सुरू आहे. 
 

 

ट्रेड  अॅनालिस्ट तरण आदर्शच्या मते, या सहा महिन्यांत जितके चित्रपट सुपरहिट ठरले किंवा जितकी कमाई झाली तितकी याआधी झाली नव्हती. पुढेही असाच क्रम सुरू राहण्याची  शक्यता आहे. सलमानच्या भारत चित्रपटाने  ४२ कोटींची ओपनिंग करून आजही स्टार पॉवरचा दबदबा कायम आहे, असे दाखवून दिले. प्रेक्षकांना आजही सुपरस्टारचे चित्रपट आवडतात.
 

ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहनच्या नुसार...,  या सर्व चित्रपटांच्या दमदार कमाईने बाॅलीवूडच्या सहा महिन्यांचा निकाल १८०० कोटींच्या पार गेला आहे. विशेष करून गेल्या तीन महिन्यांचा निकाल धमाकेदार होता. अजूनही कबीर सिंहची खरी कमाई समोर आली नाही.