आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, पाच जण गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गल्लेबोरगाव : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावजवळ आजमपूर फाट्यावर रविवारी रिक्षा व दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. नवनाथ रोहिदास हिवाळे (१९, रा. ठाकूरवाडी, ता. खुलताबाद) असे अपघातातील मृताचे नाव आहे. रुतुजा गोमलाडू (१२), कमला गोमलाडू (३५), छाया गोमलाडू (४०), हिराबाई प्रभुगुल (३५), शकुंतला शिंदे (३५) (सर्व रा. पिंपरी, निरगुडी, ता. खुलताबाद) ही जखमींची नावे आहेत.

अपघातग्रस्तांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेत डाॅ. सय्यद रहीम व चालक काकासाहेब कदम, जावेद शेख यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) दाखल केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी तीन वाजता गल्ले बोरगाव ते तिसगाव रोडवर आजमपूर फाट्यावर झाला. ठाकूरवाडी येथील नवनाथ हिवाळे हे वाळूज, पंढरपूर येथे कंपनी कामगार होते. ते दुचाकीने घराकडे जात असताना त्याच वेळेस तिसगावकडून गल्लेबोरगावकडे बाजार करण्यासाठी सागर बाबूलाल महेर(रा. पिंपरी) हे रिक्षाने प्रवासी घेऊन येत होते. या वेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात नवनाथ हिवाळे हा तरुण जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलवण्यात आला, तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात रिक्षाने मोठे नुकसान झाले.
 

बातम्या आणखी आहेत...