Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Rickshaw driver looted to lawyer in aurangabad

रिक्षाचालकाने वकिलाला निर्मनुष्य परिसरात नेले, गळ्याला चाकू लावत लुटले

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 09:28 AM IST

रेल्वे स्टेशनवरून सिडको बसस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वकिलाला रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशन एमआयडीसीत

  • Rickshaw driver looted to lawyer in aurangabad

    औरंगाबाद- रेल्वे स्टेशनवरून सिडको बसस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वकिलाला रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशन एमआयडीसीत निर्मनुष्य परिसरात नेऊन गळ्याला चाकू लावत लुटले. ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता अॅड. काझी मोहसीन अहेमद मंजूर अहेमद (३५) यांच्यासोबत हा प्रकार घडला.


    काझी खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी त्यांना रात्री सिडको बसस्थानकावरून बसने गावी जायचे होते. बीडबायपास येथील पटेल लाॅन्सच्या मागे राहत असल्याने ते पायी रेल्वेस्थानक परिसरात आले. तेथून ते सिडको बसस्थानकावर जाण्यासाठी रिक्षात (एम एच २० - २२२६) बसले. रिक्षात आधीच काही इसम बसलेले होते. रिक्षाचालकाने हॉटेल विट्स जवळून देवगिरी महाविद्यालयाच्या बाजूने रिक्षा घेत काही प्रवाशांना तेथे उतरायचे आहे, असे सांगत एमआयडीसी परिसरातील निर्मुनष्य परिसरात नेले. रिक्षा उभी करून मागे बसलेल्या दोघांनी त्यांना फायटरने मारहाण केली. त्यानंतर गळ्याला चाकू लावून सर्व पैसे काढ, अशी धमकी दिली. त्यांनी काझी यांच्या खिशातील पाकीट काढून पोबारा केला. यात ८ हजार रोख, एटीएम, क्रेडिट कार्ड व इतर कागदपत्रे होती. वेदांतनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आडे हे तपास करत आहेत.

Trending