दारूसाठी पैसे न / दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूने भाेसकून रिक्षाचालकाचा खून

प्रतिनिधी

Nov 11,2018 11:36:00 AM IST

जळगाव - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात एकाने रिक्षाचालकाच्या पोटात चाकूने वार करून भररस्त्यावर खून केला. गुरुवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.१५ वाजता रेल्वेस्थानकाच्या बाहेर हा थरार घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.


इस्माईलशहा गुलाबशहा (वय ३६, रा.गेंदालाल मिल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नितीन जगन पाटील उर्फ पपई (वय २३, रा. सरुताईनगर, आव्हाणे, ता. जळगाव) याने शहा यांचा खून केला आहे. नितीन हा देखील रिक्षाचालक आहे. घटनेच्या दिवशी त्याने शहा यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. शहा यांनी नकार दिल्यामुळे नितीनला राग आला. या रागाच्या भरात त्याने शहा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. खिशातून चाकू काढून त्यांच्या पोटात भाेसकले. यात गंभीर जखमी झालेले शहा जमिनीवर कोसळले. काही वेळातच रेल्वेस्थानक परिसरातील घटना, प्रवाशांमध्ये भीती


रेल्वेस्थानक परिसरात दिवस-रात्र वर्दळ असते. अवैध धंदे चालकांचाही उच्छाद असतो. वर्दळीच्या ठिकाणी भररस्त्यावर चाकूने भोसकून खून केल्याची घटना पाहून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. खून केल्यानंतर नितीन हा हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन पळून गेला होता. नितीनने शहा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा कोणीही मध्यस्थी केली नाही, हे विशेष हाेय

X
COMMENT