Home | Khabrein Jara Hat Ke | Rift between two sisters after a issue related to their Marriage

काही आठवड्यांत मोठी बहीण करणार होती लग्न, पण लहानीने केले असे काही की तिला बसला धक्का, 10 वर्षे मनात लपवून ठेवले दुःख

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:00 AM IST

दहा वर्षांनंतर बहिणीने लिहिलेल्या पत्रामुळे ही बाब सर्वांसमोर आली. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहे.

 • Rift between two sisters after a issue related to their Marriage

  डबलिन - प्रत्येक मुलीने लग्नाबबात काही स्वप्ने पाहिलेली असतात. पण लग्न जवळ आलेले असतानाच तिला कोणीतरी मोठा धक्का दिला तर.. आयरलँडच्या एका तरुणीबरोबर असेच काही घडले. तिच्या लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वीच तिच्या लहान बहिणीने साखरपुडा केला. ते ऐकूण नवरीला फार दुःख झाले. ऐनवेळी बहिणीने एंगेजमेंट केल्याने सर्व स्पॉटलाइट बहिणीवर असेल आणि तिच्या लग्नाकडे कोणाले लक्ष नसेल असे तिला वाटले. त्यावेळी तर ती काहीही बोलली नाही. पण नाराजीत तिने एक पत्र लिहिले. आता 10 वर्षांनी ते पत्र समोर आले आहे. एका टीव्ही शोमध्ये हे पत्र वाचण्यात आले आणि ते व्हायरल झाले आहे.


  लग्नाचा आनंदच संपला
  - ही कथा आयरलँडच्या 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका महिलेची आहे. तिच्या लग्नाच्या 45 दिवसांआधी तिच्या लहान बहिणीने एंगेजमेंट केली होती. त्यामुळे मोठी बहीण खूप नाराज झाली. रागात तिने एक पत्र लिहिले होते.
  - महिलेने रागात पत्र लिहिले पण ते कोणालाही सांगितले नाही. पण आता लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिने ते पत्र एका सोशल साइटवर शेअर केले. एका टीव्ही शोवर ते वाचून दाखवण्यात आले.
  - महिलेने लिहिलेल्या पत्रात असा मजकूर होता..
  डियर सिस्टर, माझ्या लग्नाला आता फक्त सहा आठवडे उरले आहेत. सध्या मी पाहुण्यांची यादी करण्यात बिझी आहे. माझ्यासाठी हा फार तणावाचा काळ आहे. कारण वेडिंग प्लान्ससाठी मला अनेक तडजोडी कराव्या लागत आहेत. ज्यांना मी ओळखत नाही, त्यांच्यासाठीही मी तडजोडी करतेय. दोन दिवसांपासून मी एका अशा गोष्टीसाठी रडतेय ज्यासाठी रडायला नको. (महिला बहिणीच्या एंगेजमेंटबद्दल बोलत होती) प्लीज मला चूक नको समजू, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुला आनंदी ठेवेल आणि ज्याच्याबरोबर तुला संपूर्ण आयुष्य घालवण्याची इच्छा आहे, असा कोणीतरी तुला भेटला याचा मला आनंद आहे.


  नाराजीचे कारण
  - नाराजीचे कारण लिहिताना तिने पुढे लिहिले, पण एंगेजमेंट करण्यापूर्वी तुला आणखी सहा आठवडे थांबता आले नसते का. आपण एकदा एंगेजमेंट करतो आणि एकदाच लग्नही करतो. त्यामुळे लग्नापूर्वीचे काही आठवडे माझ्यासाठीही खूप महत्त्वाचे आहेत.
  - दोन आठवड्यांनी माझी हेन नाइट (गर्ल्स बॅचलर पार्टी) होईल. कदाचित मी जास्त डिमांडिंग असेल पण या काळात सर्वांचे लक्ष माझ्यावर असायला हवे, तुझ्यावर आणि तुझ्या एंगेजमेंटवर नव्हे.
  - आता आपण लहान नाही. आणी जीवन ही काही स्पर्धा नाही. त्यामुळे मी पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आणि सध्या ते सील करून ठेवत आहे. लग्नानंतर मी ते पोस्ट करेल.
  - या निर्णयाचा माझ्यावर काय परिणाम होईल याचा तू आणि तुझ्या पार्टनरने विचार केला नाही, याने मी निराश झाले आहे. हा काळ माझ्या लग्नाच्या सेलिब्रेशनचा आहे. पण तुम्ही दोघांनी ठरवून तो माझ्यापासून दूर नेला.
  - लवकरच तुम्हाला सेलिब्रेट करण्याची संधी मिळेल. पण तुम्ही माझ्याबरोबर जे केले ते तुमच्याबरोबर कोणी करता कामा नये. मला जो त्रास झाला त्याबाबत मी कोणाला काही बोलले नाही, कारण मला तुमच्या आनंदात विरजण टाकायचे नाही. शेवटी तिने लिहिले, तर माझ्या प्रिय बहिणी, तुझ्या बिनविचारीपणासाठी तुझे आभार. तुझ्या अशा वागण्याने मला काहीही आश्चर्य वाटले नाही.

Trending