आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनापूर्वी अवश्य करा एक काम, श्रीगणेश स्वतःसोबत घेऊन जातील तुमच्या सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 23 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. आजच्या दिवशी श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन केले जाईल. गणेश विसर्जनासोबतच गणेश उत्सवही समाप्त होईल. मान्यतेनुसार भगवान श्रीगणेश जाता-जाता आपल्या घरातील सर्व अडचणी आणि दुःख सोबत घेऊन जातात. येथे जाणून घ्या, विसर्जन करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.


गणेश मूर्ती विसर्जनापूर्वी सर्वात पहिले श्रीगणेशाची विधिव्रत पूजन करून आरती करावी. नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीगणेशाला आसनासहित आपल्या दोन्ही हातांनी उचलावे. श्रीगणेशाची मूर्ती संपूर्ण घरात फिरवावी. घरातून बाहेर पडताना श्रीगणेश मूर्तीचे आणि तुमचे मुख घराच्या आतील बाजून असावे. एकदा घराच्या मेनगेटवरही ५-१० सेकंड गणेश मूर्ती ठेवावी. त्यानंतर पुढे जावे.


1. श्रीगणेश विसर्जनापूर्वी आरती करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा.


2. देवाला विसर्जनासाठी उचलताना पिवळा किंवा पांढरा कपडा पाटावर किंवा चौरंगावर टाकावा.


3. लाल गुलाब आणि दुर्वा अर्पण कराव्यात.


4. विसर्जनापूर्वी गणपती अथर्वशीर्षचे पाठ करावेत.


5. नदी, तलाव किंवा समुद्र किनारी गेल्यानंतर पुन्हा पूजा आणि आरती करावी.

बातम्या आणखी आहेत...