आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर आता ऑस्करवारी करणार \'व्हिलेज रॉकस्टार\', ऑस्करसाठी भारताकडून निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

65 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये तीन पुरस्कारांवर नाव कोरणारा आसामी चित्रपट 'व्हिलेज रॉकस्टार'ची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली आहे. रीमा दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शनापासून ते एडिटिंगपर्यंतची सर्व जबाबदारी रीमा दास यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बेस्ट फिचर फिल्म, बेस्ट एडिटिंग आणि बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट असे तीन पुरस्कार मिळाले होते. भनिता दास हिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून तिला बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 


या चित्रपटाची कहाणी गुवाहाटीनजकीच्या छाएगांवशी जुळलेली आहे.  एक 10 वर्षीय मुलगी जिचे नाव धुनु असते ती तिच्या विधवा आईसोबत या गावात राहात असते. तिचे संगीतकार होण्याचे स्वप्न असते. आपले हे स्वप्न पूर्ण करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ती कसे आपले स्वप्न पूर्ण करते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. आता हा चित्रपट ऑस्करवारीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी रीमा दास यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च केली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...