Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Rinku Rajguru is seen again in front of the audience

प्रेक्षकांपुढे रिंकू राजगुरू पुन्हा येतेय 'कागर'मधून

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 11:23 AM IST

नवतेज या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर झाली आहे.

 • Rinku Rajguru is seen again in front of the audience

  सोलापूर - सैराटच्या माध्यमाने मराठी चित्रपट सृष्टीवर आपली वेगळी छाप पाडणाऱ्या रिंकू राजगुरू म्हणजेच रसिकांच्या आर्चीकडून यंदाच्या "व्हॅलेंटाइन डे'ला एक नवा कोरा करकरीत चित्रपट भेट मिळणार आहे. नवतेज या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर झाली आहे.


  उदाहरणार्थ निर्मित, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रिंगण चित्रपट शिल्पकार दिग्दर्शक मकरंद माने यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला "कागर' हा सोलापूरच्याच मातीत बनविलेला आहे, हे आणखीन एक विशेष असणार आहे. अनोखी स्टोरी घेऊन अनोख्या पद्धतीने मांडणी केलेल्या या चित्रपटातून एक वेगळा आणि अनोखा असा आनंद दिला जाणार आहे. या चित्रपटाचे लूक सध्या सोशल मीडियात प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

  तर काही दिवसांपूर्वी रिंकू राजगुरू हिने या चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य करत असताना सोशल मीडियावर या नृत्याची झलक व्हिडिओच्या माध्यमाने व्हायरल झालेली होती. त्यावेळी या व्हायरल झालेल्या व्हीडीओला जवळपास १६ ते १७ लाख इतके हिट्स मिळालेले होते. तर दोन दिवसापूर्वीच आर्चीच्या या चित्रपटाची रिलीजची तारीख मकरंद माने यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केली आहे. १४ फेब्रुवारी २०१९ ला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आर्ची सध्या काय करते आणि आर्ची काय घेऊन येणार आहे, याचे उत्तर बहुतांशी रसिकांना या जाहीर केलेल्या घोषणेतून मिळालेले आहेत. सध्या आर्ची या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये गुंतलेली आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालेला असेल.


  नवीन विषय मांडणरा
  कागर हा एका वेगळ्या विषयाला हात घालणारा चित्रपट असून येत्या १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ही रसिकांना भेट असणार आहे . त्यामुळे रसिकांनी या चित्रपटावर नक्कीच प्रेम करावे आणि चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावा." मकरंद माने, दिग्दर्शक

Trending