आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंकू राजगुरुचा हा 'मेकअप' पाहिलात का तुम्ही! 100% संस्कारी आणि 100% आहे लाजरीबुजरी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले. त्यानंतर रिंकू कागर या चित्रपटात झळकली. या चित्रपटाला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता रिंकू तिस-या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. 'मेकअप' हे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. यापूर्वी चित्रपटाचा एक टीजर रिलीज करण्यात आला होता. 

रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये रिंकूचे दोन रुप लक्ष वेधून घेत आहेत. काचेच्या इमारतीजवळ उभी असलेली रिंकू एका लूकमध्ये साडीत दिसतेय. अतिशय सोज्वळ आणि समंजस असे रिंकूचे हे रुप आहे. दुस-या रुपात काचेत तिचे प्रतिबिंब झळकत असून बिनधास्त आणि बोल्ड अशी रिंकू दिसतेय. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. रिंकूचा हा बिनधास्त अंदाज तसेच तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे.