आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांचा संताप : दंगलखोरांना एकाही कंपनीत नोकरी मिळणार नाही अशी व्यवस्था करू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीमुळे उद्योग जगत हादरून गेले आहे. या घटनेतून आम्ही पुन्हा एकदा फीनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ, मात्र तोडफोड करणाऱ्या दंगलखोरांना आम्ही क्षमा करणार नाही. हे दंगलखोर आमच्या कंपन्यांत काम करत असतील तर त्यांना कामावरून काढू टाकू आणि नसतील तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठेच रोजगार मिळणार नाही याची काळजी घेऊ. आमचा कोणत्याही आंदोलनाला विरोध नाही, मात्र प्रत्येक आंदोलन हे लोकशाही मार्गानेच झाले पाहिजे असा आमचा आग्रह आहे, अशा भावना शुक्रवारी मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये झालेल्या बैठकीत उद्योजकांनी व्यक्त केल्या. 


गुरुवारच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीला वाळूजमधील सर्वच कारखान्यांमधील वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक हजर होते. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनांनी ही बैठक बोलावली होती. मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, बजाज व्हेंडर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश दाशरथी, एनआयपीएमचे विश्वस्त मकरंद देशपांडे, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कंपन्यांतील अधिकाऱ्यांनीही उआपबीती कथन केली. १९८३ मध्ये वसलेल्या वाळूज उद्योग वसाहतीतील उद्योग संघटना अशा प्रकारे एकत्र येण्याची चाळीस वर्षांत ही पहिलीच वेळ आहे. औद्योगिक वसाहतीत प्रचंड भीती असली तरी हिंमत न हरण्याचा निर्धार या बैठकीत उद्योजकांनी व्यक्त केला. 


आम्ही कर भरणे बंद केले तर काय होईल?
रवींद्र वैद्य म्हणाले की, आम्ही कोणताच कर चुकवत नाही. तो चुकवला तर आम्हाला नोटिसा येतात. येथे आमच्या कंपन्या जाळताना कोणी आले नाही. आम्ही आता कर भरला नाही तर काय होईल? 


तरुणांवर चांगले संस्कार करा
सीआयआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीराम म्हणाले, लहान मुले, तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. त्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे. तरुण पिढीला घरातूनच चांगले संस्कार देण्याचा आपण संकल्प करू. उद्योजकांनी प्रथम काळा गुरुवार अनुभवला. वाळूजमधील अनेक कारखान्यांचे प्रचंड नुकसान पाहून मन विषण्ण झाले, अशी भावना किशोर राठी यांनी व्यक्त केली. 


तरुणांवर चांगले संस्कार करा
सीआयआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीराम म्हणाले, लहान मुले, तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. त्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे. तरुण पिढीला घरातूनच चांगले संस्कार देण्याचा आपण संकल्प करू. 


काळा गुरुवार पाहिला
उद्योजकांनी प्रथम काळा गुरुवार अनुभवला. वाळूजमधील अनेक कारखान्यांचे प्रचंड नुकसान पाहून मन विषण्ण झाले, अशी भावना किशोर राठी यांनी व्यक्त केली. 


आम्ही नाउमेद झालेलो नाही 
राम भोगले म्हणाले की, आमच्या कंपनीच्या काचा फोडल्या तरीही आमची मने दुभंगलेली नाहीत, आम्ही नाउमेद झालेलो नाही. यापुढे असा प्रसंग ओढवणार नाही याची काळजी नक्कीच घेऊ. सर्वांनी पुन्हा सकारात्मक मनाने कंपनीत जावे. पोलिसांना सहकार्य करा. तक्रार द्या. पोलिसांनी वाळूज वाचवले. ते एक दिवसाच्या दंगलीवर निभावले. त्यांनी संयम सोडला असता तर आणखी आठ दिवस वाळूज पेटत राहिले असते. 


ऑपरेशन एलिफंट रोखले
मकरंद देशपांडे यांनी स्कोडा कंपनीतील किस्सा सांगितला. ते म्हणाले, स्कोडामध्ये असाच प्रसंग उद््भवला होता. तेव्हा स्विस अधिकाऱ्यांनी ऑपरेशन एलिफंट जाहीर केले. त्यानुसार कंपनी शहरातून गुंडाळण्याची पूर्ण तयारी केली होती. पण स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा असे होणार नाही, असा विश्वास देत ऑपरेशन एलिफंट रद्द केले होते.

 
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली उद्योजकांची भेट 
महिला व बाल विकास तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता वाळूज येथील नहार इंजिनिअरिंग, सिमेन्स व एंड्युरन्स कंपनीला भेट देऊन जमावाकडून झालेल्या तोडफोडीची पाहणी केली. या वेळी आमदार अतुल सावे, डॉ.भागवत कराड, शिरीष बोराळकर, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील तसेच सीएमआयचे अध्यक्ष राम भोगले, जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन भागातील सीएमआयएच्या सभागृहात उद्योजकांची बैठक घेतली. 


जर्मन दूतावासाने गंभीर दखल घेतली
उद्योजकांच्या बैठकीत मुंडे म्हणाल्या, सिमेन्स ही जर्मनीची मोठी कंपनी वाळूजला आहे. त्यांच्या दूतावासाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यावर सरकारने काही उपाययोजना करावी. हल्लेखोरांना शिक्षा झाली पाहिजे. 


उद्योगांना स्वतंत्र पोलिस स्टेशन द्या
वाळूज येथे पोलिस स्टेशन आहे. मात्र आम्हाला फक्त उद्योग विषयीच्या तक्रारी स्वीकारल्या जातील, सामान्य माणसाशी त्याचा काही संबंध नसेल, असे पोलिस ठाणे हवे आहे, अशी मागणी उद्योजकांनी केली. यावर सरकार तुमच्या पाठीशी असून या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी उद्योजकांना दिले. 

बातम्या आणखी आहेत...