Riots / मुलांच्या भांडणातून दंगल; दगडफेक व मारहाणीत ९ जखमी, २२ जण अटकेत

या प्रकरणी परस्परांविरुद्ध दंगल, ॲट्रॉसिटी, विनयभंग आदी कलमान्वये ८९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

प्रतिनिधी

Jun 14,2019 10:17:00 AM IST

यावल - मुलांच्या भांडणातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे बुधवारी रात्री दोन समुदायात दंगल उसळली. त्यात दगडफेक व मारहाण झाल्याने ९ जण जखमी झाले. काही माथेफिरूंनी दोन शेतकऱ्यांच्या केळी बागाही कापून टाकल्या.


या प्रकरणी परस्परांविरुद्ध दंगल, ॲट्रॉसिटी, विनयभंग आदी कलमान्वये ८९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २२ संशयितांना अटक झाली आहे. या वादानंतर दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलासह आडगावात बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. जिल्हा पाेलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर अधीक्षक लोहित मतानी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी गावात भेट देत नागरिकांना शांततेचे आवाहन केले. दंगलीनंतर समाजकंटकांनी सुधीर वामन पाटील यांचे दीड हजार, तर सुनील पंढरीनाथ पाटील यांचे अडीच हजार केळीची झाडे शेतात जाऊन कापून टाकली. उघडू तडवी यांची पानटपरी फोडून दीपक शिंदे व शशिकांत शिंदे यांच्या घरावर दगडफेक केली. घराच्या काचा फोडल्या व दुचाकीचे नुकसान केले.

X
COMMENT