आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • RIP Kushaal Punjabi : Many Celebrities Including Karanvir, Sushant Singh Were Present At Kushaal Punjabi Funeral Held In Mumbai

मुंबईमध्ये झाले कुशाल पंजाबीवर अंत्यसंस्कार, करणवीर, सुशांत सिंह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दिला अखेरचा निरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेता कुशाल पंजाबीचे अंत्यसंस्कार शनिवारी मुंबईमध्ये झाले. कुशालचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांच्याव्यतिरिक्त अभिनेता आणि टीव्ही होस्ट अर्जुन बिजलानी, सुशांत सिंह, बख्तियार ईरानी, त्याची पत्नी तनाज आणि बहीण डेलनाज, अभिनेता एजाज खान, अभिनेत्री दृष्टि धामी आणि डायरेक्टर-स्क्रीनरायटर केन घोष यांच्यासह टीव्ही इंडस्ट्रीतीळ अनेक सेलिब्रिटी त्याला अखेरचा देण्यासाठी पोहोचले होते.  

शुक्रवारी कुशालने केली आत्महत्या... 


37 वर्षांच्या कुशाल पंजाबीचे निधन शुक्रवारी मुंबईमध्ये झाले. करणवीर बोहराने माहिती देताना आपला मित्र कुशालसाठी एक नोटदेखील लिहिली. करणनुसार, 'तुझ्या जाण्याच्या या बातमीने मी हैराण आहे, मी अजूनही ही गोष्ट स्वीकार करू शकत नाहीये, मला माहित आहे तू एका उत्तम जागी आहेस.' त्याने पुढे लिहिले, 'तू मला नेहमी आयुष्याप्रती प्रेरित केले आहे. मला नेहमी तू डान्सिंग डॅडीच्या रूपातच आठवशील.'

तर दुसरीकडे त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेता चेतन हंसराजने एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने एका इंग्रजी न्यूज वेबसाईटला सांगितले की, 'हो, त्याने आत्‍महत्‍याच केली आहे. तो आपल्या पत्‍नीपासून वेगळे झाल्यापासून खूप दुखी होता. सोबतच तो बऱ्याच दिवसांपासून आजारीदेखील होता. त्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. कुशालने नोव्हेंबर 2015 मध्ये यूरोपियन गर्लफ्रेंड ऑड्रे डोलें हिच्यासोबत गोव्यामध्ये लग्न केले होते. दोघांचा एक मुलगादेखील आहे. त्याच्यासोबतच फोटो कुशाल नेहमी सोशल मीडियावर शेअर करायचा. पण मागील काही काळापासून पत्नी मुलासोबत शंघायमध्ये राहात होती आणि कुशाल मुंबईमध्ये एकटा राहात होता.  

डान्सर - मॉडेल म्हणून केली होती आपल्या करिअरची सुरुवात... 


कुशालने इंडस्ट्रीमध्ये एक डान्सर आणि मॉडेल म्हणून आपले पाऊल टाकले होते. त्याने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात 1995 मध्ये आलेल्या 'अ माउथ फुल ऑफ स्काय' ने केली होती. त्यानंतर तो 'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देखो मगर प्यार से', 'डॉन' यांसह अनेक सीरियल्समध्ये दिसला. कुशाल बॉलिवूडच्याही अनेक चित्रपटांचा भाग राहिला आहे. त्याने 'लक्ष्य', 'सलाम ए इश्क', 'हमको इश्क ने मारा' यांसह अनेक चित्रपटात काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...