आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्र सिंह धोनी बनण्यासाठी ऋषभ पंतला 15 वर्षे लागतील, सौरव गांगुलीने केली पंतची पाटराखण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ऋषभ दबावात आहे, त्याला ही लढाई एकट्यानेच लढायची आहे'

स्पोर्ट डेस्क- भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीनंतर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही यष्टीरक्षक ऋषभ पंतची पाटराखण केली आहे. गांगुली म्हणाला, "पंतने आपल्यावर होत असलेल्या टीकेतून शिकायला हवं. धोनी आता ज्या स्थानावर आहे, तिथे जाण्यासाठी पंतला कमीत कमी 15 वर्षे लागतील. सध्या होत असलेली टीका पंतसाठी चांगली आहे. त्याने आता याची सवय करुन घ्यावी." 

पंतवर पूर्ण विश्वास- विराट कोहली
 
याआधी गुरुवारी भारतीय कर्णधार विराट कोहलीने पंतची पाटराखण केली होती. तो म्हणाला होता की, "आम्हाला पंतच्या कौशल्यावर संपूर्ण विश्वास आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा. मैदानावर थोडीही चूक झाल्यास लोक धोनी-धोनी असे ओरडतात, यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होई शकतो. तो लवकरच चांगली कामगिरी करुन दाखवेल."

पंत मॅच विनर आहे- रोहित शर्मा
 
काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा म्हणाला होता की, "पंतला थोडं एकट सोडा. तो मॅच विनर खेळाडू आहे. एकदा जर तो फॉर्ममध्ये आला, तर खूप चांगली कामगिरी करतो. आपण आयपीएलमध्ये त्याची कामगिरी पाहिली आहे."ऋषभ पंतने मागील एका वर्षात 13 टी-20 मध्ये फक्त 201 रन काढले
 
पंतने मागील एका वर्षात 13 टी-20 सामन्यात फक्त 201 रन काढले आहेत. नुकतीच बांग्लादेशविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये त्याने 33 रन काढले. त्याच्या खराब कामगिरीमुळे संजू सॅमसनला जागा देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...