आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबईः बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस असून ते 66 वर्षांचे झाले आहेत. ऋषी यांनी 'मेरा नाम जोकर'(1970) या चित्रपटात बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ऋषी यांचा हीरो म्हणून 1973 साली आलेला 'बॉबी' हा चित्रपट होता. या चित्रपटाने ते रात्रीतून स्टार झाले होते. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय, त्यांच्या आयुष्यातील सहा इंट्रेस्टिंग फॅक्ट्स.
ऋषी कपूर यांच्यापासून विभक्त होऊन सलून चालवत होत्या नीतू...
- ऋषी आणि नीतू यांनी 1973 ते 1981 याकाळात 12 चित्रपटांमध्ये काम केले. याचकाळात दोघांचे सूत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी 22 जानेवरी 1980 रोजी लग्न केले.
- लग्नानंतर त्यांची मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीर यांचा जन्म झाला. सर्वकाही सुरळीत असताना 1990 मध्ये मात्र ऋषी आणि नीतू यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले हबोते. याचकाळात ऋषी यांना दारुचे व्यसन जडले होते. बातम्यांनुसार, मद्यधुंद अवस्थेत त्यांनी अनेकदा नीतू यांना मारहाणदेखील केली होती.
- ऋषी कपूर यांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून नीतू यांनी त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांत घरगुती हिंसाचाराची तक्रारही नोंदवली होती.
- नीतू यांनी लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते, त्यामुळे पैशांसाठी त्यांनी सलून सुरु केले होते. कालांतरांना ऋषी आणि नीतू यांच्या नात्यातील दुरावा दूर झाला आणि त्या मुलांसोबत ऋषी कपूर यांच्याकडे परतल्या.
स्ट्रिक्ट बॉयफ्रेंड होते ऋषी
- ऋषी अतिशय स्ट्रिक्ट बॉयफ्रेंड होते, असे नीतू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. असे म्हटले जाते की, नीतू त्यांची गर्लफ्रेंड झाल्यानंतर त्यांना रात्री साडेआठनंतर शूटिंगसाठी परवानगी दिली नव्हती.
'प्रेम रोग'च्या रिलीजनंतर दोन महिन्यांनी झाला रणबीरचा जन्म...
- दिग्दर्शक राज कपूर यांचा 'प्रेम रोग' हा चित्रपट 31 जुलै 1982 रोजी रिलीज झाला होता. चित्रपटात ऋषी यांच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरे मेन लीडमध्ये होती.
- या चित्रपटाच्या रिलीजच्या दोन महिन्यांनी म्हणजे 28 सप्टेंबर 1982 रोजी रणबीर कपूरचा जन्म झाला.
- ऋषी आणि नीतू यांचे लग्न 22 जानेवारी 1980 रोजी झाले होते. 1980 मध्येच 15 सप्टेंबर रोजी नीतू यांनी मुलगी रिद्धिमा कपूरला जन्म दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.