Home | Gossip | Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

B'day: ऋषी कपूर यांनी कधी 18 तर कधी 22 वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत केला रोमान्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 01:30 PM IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचा आज (4 ऑगस्ट) वाढदिवस असून त्यांनी वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत.

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचा आज (4 सप्टेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. ते बॉलिवूडमधील एक असे स्टार आहेत ज्यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. आजच्या या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी वयाने मोठ्या असलेल्या ऋषी कपूरबरोबर स्क्रिन शेअर केली. या अभिनेत्रींमध्ये पद्मिनी कोल्हापुरे, फरहा नाज, किमी काटकर, दिव्या भारती, उर्मिला मातोंडकर, सोनम, नीलम यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

  16 वर्षांच्या सोनमसोबत केला होता रोमान्स...
  1988 साली 'विजय' चित्रपटात ऋषी कपूर यांनी अभिनेत्री सोनमसोबत काम केले होते. हा सोनमचा डेब्यू चित्रपट होता. त्यावेळी सोनम 16 तर ऋषी 36 वर्षांचे होते. दोघांमध्ये 20 वर्षाचे अंतर होते.

  पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही अभिनेत्रींविषयी...

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1992 साली आलेला चित्रपट 'दीवाना' मध्ये ऋषी कपूर यांनी दिव्या भारतीसोबत रोमान्स केला होता. त्यावेळी दिव्याचे वय 18 वर्षे तर ऋषीचे वय 40 वर्षे होते. दोघांमध्ये जवळपास 22 वर्षाचे अंतर होते. दिव्याचे निधन झाले आहे.

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1981 साली आलेला चित्रपट 'जमाने को दिखाना है' मध्ये ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे लीड रोलमध्ये होते. त्यावेळी ऋषी यांचे वय 34 तर पद्मिनी कोल्हापूर यांचे वय 16 होते. या दोघांमध्ये जवळपास 13 वर्षाचे अंतर होते. 

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  'दोस्ती दुश्मनी' मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत किमी काटकरने स्क्रीन शेयर केली होती. हा चित्रपट 1986 साली झाला होता. ऋषी कपूर त्यावेळी 34 तर किमी काटकर त्यावेळी 21 वर्षाची होती. दोघांमध्ये 13 वर्षाचे अंतर होते. 

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1990 मध्ये 'अमीरी गरीबी' चित्रपटात ऋषी कपूर आणि नीलमने स्क्रीन शेयर केली होती. त्यावेळी ऋषी 38 तर नीलम 22 वर्षाचे होते. दोघांमध्ये जवळपास 16 वर्षाचे अंतर होते.

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1986 साली आलेला चित्रपट 'नसीब अपना-अपना' मध्ये ऋषीसह फराह मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी ऋषी यांचे वय 34 तर फराहचे वय 18 वर्षे होते. दोघांमध्ये जवळपास 16 वर्षाचे अंतर होते.

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1993 साली आलेला चित्रपट 'अनमोल' मध्ये मनीषा कोइरालासोबत ऋषी कपूरने रोमान्स केला. त्यावेळी ऋषी 41 तर मनीषा 23 वर्षाची होती. दोघांमध्ये 18 वर्षाचे अंतर होते. 

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1995 साली आलेला चित्रपट 'हम दोनों' मध्ये ऋषीसोबत पूजा भट्टने मुख्य भूमिकेत काम केले होते. त्यावेळी ऋषी यांचे वय 43 तर पूजाचे वय 23 वर्षे होते. दोघांमध्ये दवळपास 20 वर्षाचे अंतर होते. 

 • Rishi Kapoor Birthday Special Rishi Kapoor Share Screen With Younger Actresses

  1991 साली आलेला चित्रपट  'हिना' मध्ये ऋषी कपूरसोबत अश्विनी भावे मुख्य भूमिकेत काम केले होते. त्यावेळी ऋषी यांचे वय 39 वर्षे तर अश्विनीचे वय 19 वर्षे होते. दोघांमध्ये जवळपास 20 वर्षाचे अंतर होते. 

Trending