आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर मुक्त झाले ऋषी कपूर, एका वर्षानंतर परतत आहेत मुंबईला, इमोशनल झालेल्या अनुपम यांनी लिहिले - 'मी खुश आहे आणि दुखी सुद्धा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋषी कपूर आणि नीतू कपूर पूर्ण एका वर्षानंतर न्यूयॉर्कहून मुंबईला परतत आहेत. यामुळे त्यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांनाच प्रवास सुखाचा होण्याची प्रार्थना केली आहे. अनुपम यांनी एका इमोशनल ट्वीटमध्ये लिहिले आहे. "प्रिय नीतू कपूर आणि ऋषी कपूर. न्यूयॉर्कमध्ये सुमारे एक वर्ष राहिल्यानंतर भारतात परतण्यासाठी सुरक्षित प्रवासाची प्रार्थना आहे. मला संमिश्र फीलिंग येत आहे. मी खुश आहे आणि दुखीदेखील. मला तुझी खूप आठवण येईल. आपण सोबत सोबत खूप चांगला वेळ घालवला. धन्यवाद. प्रेम आणि प्रार्थना."
 

 

ऋषी कपूर कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गेले होते न्यूयॉर्कला... 
ऋषी कपूर सप्टेंबर 2018 मध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. अनुपम खेर तिथे अमेरिकन टीव्ही शो 'न्यू एम्सटर्डम' करत आहेत, ज्याचे दुसरे सीजन याच महिन्याच्या शेवटपर्यँत टेलीकास्ट होईल. शोच्या शूटिंगमधून ब्रेक मिळताच अनुपम, ऋषी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात जायचे. कपूर दाम्पत्यासोबत त्यांचे लंच आणि डिनर करतानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर दिसायचे. ऋषी कपूर आता कॅन्सरमुक्त झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी ते मुंबईला पोहोचणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...