आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्सने विचारले कॅन्सरमुळे एका रात्रीत केस पांढरे झाले का? उपचारासाठी अमेरिकेला गेलेल्या ऋषी कपूर यांनी स्वतः सांगितले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऋषी कपूर सध्या कुटुंबासह अमेरिकेत उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांच्या नव्या हेअर लूकमुळे सोशल मीडियावर अफवा उडाली की, कॅन्सरमुळे एका रात्रीत त्यांचे केस पांढरे झाले आहेत. आता ऋषी कपूर यांनी स्वतः यावर उत्तर दिले आहे. हेयर स्टायलिस्ट बरोबरचा फोटो ट्वीट करत त्यांनी फॅन्सना सांगितले की, सगळे संशय मिटवण्यासाठी हा फोटो आहे. माझे केस अवान कॉन्ट्रॅक्टरने डाय केले असून ते एका चित्रपटासाठी तसे केले आहेत. हा चित्रपट हनी त्र‍ेहान प्रोड्युस करत असून हितेश भाटिया दिग्दर्शक आहेत. 


रमधीर यांनीही दिले आहे स्पष्टीकरण 
- ऋषि कपूर 29 सप्टेंबरपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. यादरम्यान 1 ऑक्टोबरला त्यांची आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले. पण ऋशी कपूर त्यांना निरोप द्यायला पोहोचू शकले नाही. 
- त्यांची पत्नू नीतू आणि मुलगा रणबीरदेखिल मुंबईला येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या आजाराबाबत चर्चा सुरू झाल्या. ऋषी यांनी थर्ड स्टेज कॅन्सर असल्याच्या अफवाही उडाल्या. 
- या सर्वाबाबत ऋषी यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी उत्तर दिले होते. अद्याप डॉक्टरांनी टेस्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे कॅन्सरच्या अफवा असल्याचे ते म्हटले होते. 


प्रियंका, अनुपम खेर यांनी घेतली भेट 
अमेरिकेत प्रियांका चोप्राने ऋषी कपूरची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असलेली सोनाली बेंद्रेही पतीसह त्यांना भेटायला आली होती. अनुपम खेर यांनीही त्यांची भेट घेतली. 

This is to dispel all notions and wrong speculations of my hair turning grey/white overnight. My hair was dyed by Awan Contractor for a film produced by Honey Trehan and Sony pictures directed by Hitesh Bhatia. Film is untitled. Trust this clears the air pic.twitter.com/0v5Z0nFcDN

— Rishi Kapoor (@chintskap) October 9, 2018

This is the final look of the film. Sharma ji. All grey! Will revert to original hair colour soon pic.twitter.com/luM4MKGVs1

— Rishi Kapoor (@chintskap) October 9, 2018

बातम्या आणखी आहेत...