आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत उपचार घेत आहेत ऋषी कपूर, अनुपम खेरसोबत फिरताना दिसले अशक्त, शेअर केला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. अमेरिकेत उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय ऋषी कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते आपले मित्र अनुपम खेरसोबत मैनहट्टनच्या रोडवर फिरताना दिसत आहेत. यामध्ये उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ऋषी कपूर पहिल्यापेक्षा अशक्त दिसत आहेत. ऋषी कपूर यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की - 

 

"न्यूयॉर्क, मैनहट्टन. मग फ्री किंवा केअर फ्री. दुपारी मैडिसन एवेन्यूवर कलीग आणि जुने मित्र अनुपम खेरसोबत."


अनुपम खेरनेही हाच व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले - 
"प्रिय ऋषी कपूर मैनहट्टनच्या रस्त्यांवर तुम्हाला भेटने आणि तुमच्यासोबत वेळ घालवणे रोमांचक होते. तुम्ही खरंच खुप चांगले, मनोरंजक, गप्पा मारणारे व्यक्ती आहात. तुमच्याशी चित्रपटांचे मॅजिक आणि गरजांवर बोलूण चांगले वाटले."

 

आईच्या निधनानंतर पहिल्यांदा दिसले ऋषी कपूर 
ऋषी कपूर 29 सप्टेंबरपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. याच काळात 1 अक्टोबरला त्यांची आई कृष्णा राज कपूर यांचे कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाले होते. परंतु त्यांना अत्यंसंस्कारत पोहोचता आले नाही. एवढेच काय तर त्यांची पत्नी नीतू आणि मुलगा रणबीरही मुंबईत येऊ शकले नव्हते. फक्त मुलगी रिध्दिमा कृष्णा राज यांच्या अंत्यविधीत उपस्थित होती. 

 

कँसर असल्याची होती अफवा
ऋषी कपूर यांच्या आजाराचा अजून खुलासा झालेला नाही. परंतु काही दिवसांपुर्वी चर्चा होत्या की, ते कँसरच्या तिस-या स्टेपवर आहेत आणि उपचार घेत आहेत. परंतु ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले होते. रणधीर म्हणाले होते की, डॉक्टर्सनी अजून त्यांच्या तपासण्या केलेल्या नाहीत. अशावेळी कँसरचे वृत्त हे फक्त अफवा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...