• Home
  • Gossip
  • Rishi Kapoor went to the salon to cut his hair, the person recognizes him and played his well known song

Bollywood / न्यूयॉर्कच्या हेअर कटिंग सलूनमध्ये गेले होते ऋषी कपूर; मालकाने केवळ ओळखलेच नाही, तर केले असे काही...

परदेशात हेअर कट करतानाचा हा सुखद प्रसंग चिंटूजींनी केला ट्वीट

दिव्य मराठी वेब

Aug 17,2019 05:00:33 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेते ऋषी कपूर मागच्या 9 महिन्यापासून न्यूयॉर्कमध्ये आहेत. ते तिथे कॅन्सरवर उपचार घेत होते. ऋषी आता कॅन्सरमुक्त झाले आहेत आणि लवकरच भारतात परतणार आहेत. अशातच ऋषी कपूर यांनी टि्वटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ऋषी यांचा हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. झाले असे की, ऋषी कपूर ज्या सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेले होते, तिथे एका चाहत्याने त्यांना ओळखले आणि त्यांचे प्रसिद्ध गाणे 'मैं शायर तो नहीं' हे वाजवले. हा व्हिडीओ पोस्ट करत ऋषी कपूर यांनी लिहिले, 'माझे गाणे न्यूयॉर्कच्या सलूनमध्ये वाजत आहे. एका रशियनने मला पाहताक्षणी ओळखले आणि आपल्या नोट बुकमधून हे गाणे वाजवले.' ऋषी कपूर यांनी त्या चाहत्यांचे आभारही मानले.

X
COMMENT