Tweet / 8 महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत ऋषी कपूर, आता येतीये घरची आठवण; म्हणाले - मी घरी कधी परत जाऊ शकेन?

ऋषी कपूरची कर्करोगातून झाली मुक्तता, फिल्ममेकर राहुल रवैल यांनी केला होता खुलासा
 

दिव्य मराठी

Jun 01,2019 01:01:00 PM IST

बॉलीवुड डेस्क - बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर गेल्या आठ महिन्यांपासून न्यूयॉर्कला कर्करोगावर उपचार घेत आहेत. आता ते या आजारातून मुक्त झाले आहेत. पण त्यांना मायदेशी परतण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. दरम्यान ऋषी कपूर यांना घरची आठवण येत आहे. मी घरी जाणार याबाबत त्यांनी ट्विटरवर अत्यंत भावनिक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, 'न्यूयॉर्कमध्ये मला 9 महिने झाले आहेत. मी घरी कधी जाणार'


आईच्या अंत्य दर्शनाला देखील भारतात येऊ शकले नव्हते ऋषी
> ऋषी कपून यांनी 29 सप्टेंबर 2018 रोजी एक ट्विट करून ते वैद्यकिय तपासणीसाठी अमेरिकेला गेल्याचे सांगितले होते. सोबतच लोकांनी मला शुभेच्छा द्याव्यात पण कोणत्याही प्रकारचा चुकीचा अंदाज न लावण्याचे त्यांनी सांगितले होते. सोबतच लवकर परतणार असल्याचे त्यांनी वचन दिले. ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणत्या आजाराचा खुलासा केला नव्हता. पण त्यांनी कर्करोग असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. ते अमेरिकाला गेल्याच्या दोन दिवसांनंतर त्यांची आई कृष्णा राज यांचे निधन झाले होते. पण ऋषी त्यांच्या अंत्य दर्शनाला देखील भारतात येऊ शकले नव्हते.


ऋषी कपूरची कर्करोगातून झाली मुक्तता

- फिल्ममेकर राहुल रवैल यांनी एका महिन्यापूर्वी ऋषी कपूरची कर्करोगापासून मुक्तता झाल्याचा आपल्या फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला होता. 30 एप्रिल रोजी केलेल्या या पोस्टमध्ये रवैलने लिहिले होते की, 'ऋषी कपूर (चिंटू) ला कँसरपासून सुटका झाली.' पण काही प्रक्रिया बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्याला आणखी काही वेळ न्यूयॉर्कमध्ये रहावे लागणार आहे.


<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Frahuul.rawail%2Fposts%2F10156849655660306&width=500" width="500" height="476" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

X