लोकसभा निवडणूक / लोकसभा निवडणूक : न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेले ऋषि कपूर नाही करू शकले मतदान, ट्विटरवर लिहिले - 'तुम्ही मात्र मतदान नक्की करा'

पत्नी नीतूच्या एका पोस्टने दिले होते कॅन्सरचे संकेत... 
 

दिव्य मराठी

Apr 30,2019 02:10:13 PM IST

बॉलिवूड डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. यादरम्यान 9 राज्यातील 72 जागांसाठी मतदान झाले आहे. यामध्ये मुंबईदेखील सामील आहे. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेले अभिनेता ऋषि कपूर मुंबईचे वोटर आहेत. पण यावेळी ते आपल्या मताधिकाराचा उपयोग करू शकले नाही. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती देऊन सर्व वोटर्सना आपल्या वोटचा सदुपयोग करण्याची अपील केली आहे.

Called the Indian Consulate’s office here in NY to inquire if there was any facility for people like us to vote(away from home)There wasn’t. Please do not forget to vote wherever and whenever you have to. Jai Hind! Vande Mataram! (Sorry for earlier error) pic.twitter.com/A0heLdBhZv

— Rishi Kapoor (@chintskap) April 28, 2019

ऋषि कपूरने लिहिले, 'मतदान करायला विसरू नका...'
ऋषि कपूरने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "मी न्यूयॉर्कच्या इंडियन कॉन्सुलेट ऑफिसमध्ये फोन करून विचारले होते की, येथे आमच्यासारख्या लोकांना आमच्या देशातील निवडणुकीत वोट करण्याची काही सुविधा एके का ? पण उत्तर नाही असेच आले. तुम्ही जिथे असाल आणि जसे असाल तसे वोट करायला विसरू नका. जय हिंद! वंदे मातरम!" ऋषि कपूर सुमारे 7 महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांच्या आजाराबद्दल अद्याप काहीही कळलेले नाही.

पत्नी नीतूच्या एका पोस्टने दिले होते कॅन्सरचे संकेत...
कपूर कुटुंबातील कोट्याही सदस्याने ऋषिच्या आजाराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण जानेवारीमध्ये जेव्हा त्यांची पत्नी नीतू कपूरने एका इंस्टाग्राम पोस्टकेली होती. तेव्हा त्यांना कॅन्सर असल्याचा अंदाज लावला जात आहे. नीतूने लिहिले, "2019 च्या शुभेच्छा... काहीही संकल्प नाही, यावर्षी केवळ एक इच्छा... पॉल्युशन ट्रॅफिक कमी व्हावी. आशा आहे की, भविष्यात कॅन्सर केवळ एक राशीच (कर्क) राहावी. द्वेष नसावा, गरीबी कमी व्हावी, प्रेम आणि आनंद वाढत जावे आणि सर्वात महत्वाचे सर्व स्वस्थ राहावे."

View this post on Instagram

Happy 2019 🎈 no resolutions only wishes this year !!! Less pollution traffic!! Hope in future cancer is only a zodiac sign !!! No hatred less poverty loads of love togetherness happiness n most imp. Good health ❤️❤️❤️❤️❤️

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on Dec 31, 2018 at 1:01pm PST

X