Bollywood / पत्नी नीतूसोबत बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचले ऋषी कपूर, नीतू यांचा तमिळ भाषेत बोलतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

नीतू यांनी स्वतः शेअर आपला केला व्हिडीओ  

Sep 08,2019 04:19:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेते ऋषी कपूर न्यूयॉर्कहुन भारतात परतले आहेत. त्यांचे स्वास्थ्य आता आधीपेक्षा चांगले आहे, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी ते आपली पत्नी नीतू कपूरसोबत बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यादरम्यान नीतू अचानक तमिळ भाषेमध्ये टंग ट्विस्टर बोलू लागल्या. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नीतू कपूरने व्हिडीओ शेअर करून लिहिले, ‘बालाजीचा आशीर्वाद घेतल्यानंतर मी त्यांचे मनोरंजन तमिळ टंग ट्विस्‍टरने केले.’ व्हिडिओमध्ये नीतू या तमिळ भाषेत बोलत असताना ऋषी कपूर हात आणि चेहऱ्याच्या मुद्रा बनवताना खूप चांगले दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ 44 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. अभिनेत्यांच्या फॅन्सने कमेंटमध्ये लिहिले की, त्यांना स्वस्थ बघून चांगले वाटत आहे.

नीतू कपूरने शेअर केलेला व्हिडीओ…

X