आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा, सीआयईच्या जगातील जाळ्याचा राज्याला फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगातील दिग्गज मानली जाणारी  स्पेनमधील बिलियन डॉलर  ऑटोमोटिव्ह कंपनी “सीआयई’ ने औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स कंपनी विकत घेतली आहे. त्यामुळे अॅल्युमिनियम डायकास्टिंग या प्रकारात औरंगाबाद हे कंपनीचेे ग्लोबल हेडक्वार्टर होऊ शकते, असे  मत बागला समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ऋषिकुमार बागला यांनी दिव्य मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. 


प्रश्न : “सीआयई’ चीच निवड का केली?
- स्पेनची ही कंपनी आहे. या कंपनीने जगातील अनेक कंपन्या फक्त विकत घेतल्या नाहीत, तर त्यांचा मोठा विस्तार केला. त्यांचे ते पेटंट मॉडेल आहे. ही कंपनी रोजगार देताना मागेपुढे पाहत नाही.


प्रश्न : राज्याच्या आणि औरंगाबादच्या दृष्टीने व्यवहाराचे महत्त्व काय?
- या कंपनीकडे अॅल्युमिनियम डायकास्टिंग हा प्रकार अस्तित्वात नव्हता. औरंगाबादमध्ये आमच्या कंपनीच्या रूपाने सापडला. त्यामुळे औरंगाबाद आता अॅल्युमिनियम डायकास्टिंगचे ग्लोबल हेडक्वार्टर  झाले आहे. या संधीचे सोने कसे करायचे ते आपल्या सर्वांच्या हातात आहे. सीआयईला आपण शहरवासीय कसे वातावरण देतो? इज ऑफ डुइंगची संकल्पना कशी वापरतो? ती पुरेशी राबवतो काय? यावर शहराचे अाणि राज्यात विस्ताराचे भवितव्य अवलंबून आहे.


औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स : १९८५ मध्ये ही कंपनी कोलकाता येथून औरंगाबादला येऊन कै. आर.एन बागला यांनी वयाच्या पन्नाशीनंतर सुरू केली. दुचाकी, तीनचाकी वाहनासाठी लागणारे अॅल्युमिनियम डायकास्टिंग ही कंपनी करते. औरंगाबाद, पुणे, पंतनगर या शहरांत मिळून एकूण पाच कारखाने आहेत. हा प्रवास ३० वर्षांत ९०० कोटींवर पोहोचला.


काय आहे सीआयई ऑटोमोटिव्ह...
सीआयई ही स्पेनमधील जगातील बिलियन डॉलर उलाढाल असणारी दिग्गज ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. १९८५ मध्ये मेक्सिको येथून सुरुवात झाली. अन्डेस अरेनाझा हे सीईओ आहेत. जगभरात शंभर कंपन्यांचे जाळे आहे. युरोपातील ८० टक्के कारचे सुटे भाग तयार करते. २०१३ मध्ये महिंद्रासोबत महिंद्रा सीआयई नावाने उपकंपनी सुरू केली. महिंद्राचेही जगभर जाळे आहे. फोर्जिंगसह, ट्रक तयार करणारे चार कारखाने युरोपात आहेत.महिंद्रा-सीआयई ची उलाढाल ९,७३५ कोटी आहे. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे.

बातम्या आणखी आहेत...